Ambedkar Jayanti 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

Ambedkar Jayanti 2025 HD Images: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी ब्रिटिश भारतातील मध्य भारत प्रांतातील महू लष्करी छावणीत झाला. ते कबीर पंथाचे अनुयायी होते. भीमराव आंबेडकरांचे पूर्वज ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात बराच काळ सेवा बजावत होते. तसेच त्यांचे वडील रामजी सकपाळ यांनी महू छावणीत भारतीय सैन्यात सेवा बजावली होती. त्यांच्या जातीमुळे बाबासाहेबांना सामाजिक प्रतिकाराचा सामना करावा लागला. शालेय शिक्षणात सक्षम असूनही भीमराव यांना अस्पृश्यतेमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

बाबासाहेबांनी आपलं जीवन अस्पृश्यासाठी खर्ची केलं. त्यांनी अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला आणि समाजाला न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांचे कार्य समाजातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून पुढील पिढ्यांसाठी देखील ते महत्त्वाचे ठरणार आहे. आज आंबेडकर जयंतीनिमित्त (Ambedkar Jayanti 2025) WhatsApp Status, Greetings द्वारे तुम्ही मित्र-परिवारास खास शुभेच्छापत्र पाठवू शकता आणि महामानवाच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.

भीम जयंतीच्या शुभेच्छा - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !

Ambedkar Jayanti 2025 HD Images (फोटो सौजन्य - File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2025 HD Images 2 (फोटो सौजन्य - File Image)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!

Ambedkar Jayanti 2025 HD Images 3 (फोटो सौजन्य - File Image)

क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,

महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

Ambedkar Jayanti 2025 HD Images 5 (फोटो सौजन्य - File Image)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

Ambedkar Jayanti 2025 HD Images 6 (फोटो सौजन्य - File Image)

अस्पृश्य समुदायातील बाबासाहेबांची वाढती लोकप्रियता आणि सार्वजनिक पाठिंब्यामुळे, त्यांना 1931 मध्ये लंडनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तेथे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याच्या मुद्द्यावर गांधींशी त्यांचा जोरदार वाद झाला आणि ब्रिटिशांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी सहमती दर्शवली. धर्म आणि जातीच्या आधारावर स्वतंत्र मतदारसंघांचे कट्टर विरोधक असलेले गांधीजींना भीती होती की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने हिंदू समाजात फूट पडेल.