Sambhaji Maharaj Punyatithi 2024 Messages: शिवाजी महाराजांचे थोरले सुपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांचा जन्म 14 मे, 1657 रोजी झाला होता. ते छत्रपती शिवाजी आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी हे महान राजा आणि योद्धा मानले जातात. संभाजी आपल्या शौर्यासाठी खूप प्रसिद्ध होते. संभाजी महाराजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत 120 युद्धे केली आणि एकाही युद्धात त्यांचा पराभव झाला नाही. 11 मार्च हा संभीजी महाराज बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो.
1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजींनी गादी स्वीकारली. त्याच्या शौर्याने त्रस्त होऊन दिल्लीच्या सम्राट औरंगजेबाने छत्रपती संभाजीला पकडले जाईपर्यंत आपला मुकुट परिधान करणार नाही, अशी शपथ घेतली होती. 11 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त खालील HD Images, Whatsapp Status, Wishes, Quotes शेअर करून करून तुम्ही शंभूराजेंना अभिवादन करू शकता. (वाचा - छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन!)
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।
महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
यांना पुण्यतिथीनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा!
रणांगणी रक्ताने माखले अंग जरी,
शौर्यास ज्याच्या किंचीतही भंग नाही,
मृत्यूस न भीता अवघा रणकंद झाला,
तया प्रणाम कोणी दुजा वंद्य नाही..
छत्रपती संभाजी महाराज,
यांच्या बलिदान दिनानिमित्त,
विनम्र आदरांजली !
कोंढण्यास तानाजी गेला...
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला...
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी
स्वराज्य रक्षक संभाजी जाहला...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
शत्रू ही मरताना त्याचं कौतुक करून गेला
असा वाघाचा छावा संभाजी
सह्याद्रीचा दुसरा छत्रपती राजा होऊन गेला!
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
पाहुनी शौर्य तुझंपुढे
मृत्यूही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी
माझा शंभू अमर झाला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी साम्राज्य संपेल असे औरंगजेबाला वाटत होते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमुळे सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन लढाई सुरू केली. त्यामुळे औरंगजेबाला दख्खनमध्येच बलिदान द्यावे लागले. दख्खन जिंकण्याचे त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले.