Ambedkar Jayanti 2025 Wishes (फोटो सौजन्य - File Image)

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Wishes In Marathi: दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती (Ambedkar Jayanti 2025) साजरी केली जाते. या दिवसाला भीम जयंती असेही म्हणतात. हा दिवस 'भारतीय संविधानाचे जनक' डॉ. भीम राव यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. 1891 मध्ये जन्मलेले आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, कायदेतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. दरवर्षी त्यांची जयंती देशभरात पूर्ण भक्ती आणि आदराने साजरी केली जाते.

14 एप्रिल 2025 रोजी डॉ. आंबेडकरांची 135 वी जयंती साजरी होणार आहे. या दिवशी संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी असेल. आंबेडकर जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकर जयंतीनिमित्त तुम्ही WhatsApp Status, Facebook Greetings, Quotes द्वारे महामानवाच्या स्मृतीस त्रीवार अभिवादन करू शकता.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जयंती निमित्त महामानवाच्या स्मृतीस,

विनम्र अभिवादन!

|| जय भीम ||

Ambedkar Jayanti 2025 Wishes 1 (फोटो सौजन्य - File Image)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,

|| जय भीम ||

Ambedkar Jayanti 2025 Wishes 2 (फोटो सौजन्य - File Image)

नमन त्या पराक्रमाला

नमन त्या देशप्रेमाला

नमन त्या ज्ञान देवतेला

नमन त्या महापुरुषाला

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ambedkar Jayanti 2025 Wishes 3 (फोटो सौजन्य - File Image)

निळ्या रक्ताची धमक बघ

स्वाभिमानाची आग आहे,

घाबरू नको कुणाच्या बापाला

तू भीमाचा वाघ आहे…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

|| जय भीम ||

Ambedkar Jayanti 2025 Wishes 4 (फोटो सौजन्य - File Image)

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

जय भीम...!

Ambedkar Jayanti 2025 Wishes 5 (फोटो सौजन्य - File Image)

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी संस्थांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. लोक त्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतात. आंबेडकर जयंती पहिल्यांदा 14 एप्रिल 1928 रोजी पुण्यात साजरी करण्यात आली होती. हा पुढाकार सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी घेतला होता. तेव्हापासून ही परंपरा दरवर्षी सुरू आहे आणि आजही ती केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायांद्वारे साजरी केली जाते.