Nirjala Ekadashi 2019 Puja Vidhi: जेष्ठ मास महिन्यातील शुक्लपक्ष एकादशीला निर्जला एकादशी असे म्हणातात. संपूर्ण वर्षभरातील येणाऱ्या 24 एकादशीपैकी ही सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण एकादशी असल्याचे मानले जाते. स्कंद पुराणनुसार अद्याप कोणीही येणाऱ्या या एकादशीचे व्रत केले नाही आहे. परंतु निर्जला एकादशी निमित्त व्रत केल्यास त्या व्यक्तीला वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे पुण्य लाभते असे म्हटले जाते. महाबली भीमाने निर्जला एकादशीचे व्रत करुन सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त केले होते. त्यामुळे त्याला भीमसेनी एकादशी सुद्धा संबोधले जाते.
या दिवशी भगवान विष्णु याची विशेष पद्धतीने पूजाअर्चना केली जाते. हे व्रत करताना एकादशीचा सुर्योदर ते द्वादशीच्या सुर्योदयापर्यंत निर्जल व्रत ठेवावे लागते. म्हणजे व्यक्तीला पाण्यासाठी परवानगी नसते. या व्रतामुळे 'जल संरक्षण' याचा संदेश दिला जात असल्याचे म्हटले जाते. तर भाविक या दिवशी रात्री जागरण करुन भगवान विष्णूची पूजा करतात. त्यामुळे जीवनात सकारात्मक उर्जा मिळते असे मानले जाते. मात्र रात्री सोने घालणे अपशकुन मानले जाते. त्यामुळे आयुष्यात नकारात्मक प्रभाव पडतो. या दिवशी गंगा स्नानालासुद्धा महत्व असते. तर व्रत ठेवल्यास ब्राम्हणाला कपडे, दूध, फळे, तुळशीची पाने दान केल्यास ते शुभ मानले जाते.
निर्जला एकादशी व्रत पूजा विधी:
अंघोळ केल्यानंतर भगवान विष्णु याच्या समोर व्रत करण्याचा संकल्प करा. तसेच पूजा करतेवेळी विष्णुला पिवळ्या रंगाचे फळ, फुले किंवा पक्वान्न यांचा नैवेद्य दाखवावा. दिवा लावून त्याची आरती करावी. ऊँ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा. एकादशी दिवशी पाण्याचे दान करा.
निर्जला एकादशी व्रत शुभ मुहूर्त:
एकादशी तिथी आरंभ: 12 जून संध्याकाळी 6.27 वाजता
एकादशी तिथी प्रारंभ: 13 जून संध्याकाळी 4.49 वाजता
एकादशी व्रत: 13 जून 2019
व्रत पारण मुहूर्त: 14 जून सकाळी 6.04 वाजल्यापासून ते 8.42 वाजता
(Vat Purnima 2019: जाणून घ्या वटपौर्णीमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी)
निर्जला एकादशीचे व्रत थोडे कठीण असते. या दिवशी व्रत करणार असल्यास सावधानी बाळगा. तसेच व्रत केल्यास रात्री झोपणे टाला. संपूर्ण रात्र जागून भगवान विष्णुची पूजा करा. तसेच व्रत ठेवल्यानंतर पान खाणे टाळा. त्यामुळे रजोगुणाची प्रवृत्ती व्यक्तीमध्ये वाढते असे म्हटले जाते.