New Year 2020 (Photo Credits: Unsplash)

नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी अनेक जण स्वत: मध्ये काही तरी चांगला बदल करण्याचा प्रयत्न करतात त्यालाच नववर्षाचा संकल्प म्हणतात असं सर्वसाधारणपणे प्रचलित आहे. नववर्ष म्हटला की संकल्पांचा नुसता पूर वाहतो. काही जण तर नवीन वर्षातील संकल्पांची जणू यादीच बनवतात. मात्र त्यातील किती जण ते संकल्प पूर्णत्वास नेतात हे सांगणं थोडं अवघड आहे. कारण मोठमोठ्या बाता करुन संकल्प सांगतात खरे मात्र ते पूर्ण करणारे अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहे. हे संकल्प का पूर्ण होत नाहीत याची कारणे बरीच आहेत. मात्र

ती समजणे फार अवघड आहे.

आपली एखादी गेलेली गोष्ट, मग तो मागे पडलेला छंद असो किंवा आरोग्य असो, परत मिळवणं याप्रकारचा संकल्प तुम्ही केलात तर तो टिकण्याची शक्यता जास्त असते असं दिसून येतं. संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिलेल्या गोष्टींचा विचार केलात तर त्या नक्की पूर्ण होऊ शकतात.

1) तुमचा छंद किंवा तुमच्या सर्वात आवडत्या गोष्टी करण्याचा संकल्प तुम्ही केला असेल तर तुम्ही तो नक्कीच पूर्णत्वास न्याल.

2) आपण केलेले संकल्प इतरांसाठीही महत्त्वाचे आहेत हे लक्षात आलं आणि आपण संकल्प मोडला तर 'इतरांचं नुकसान होईल' ही जाणीव जर झाली तर आपण आपले संकल्प नीट पाळतो असंही एका अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. New Year 2020: नववर्षात कोणते संकल्प करु शकता; पाहा काही भन्नाट आयडियाज

3) आपल्या प्रतिष्ठेचा विचार आहे असे समजून संकल्प केलात तर तो नक्की पूर्ण होऊ शकतो.

4) उगाच संकल्पांचा भडिमार न करता मोजकेच आणि जमेल तितकेच संकल्प केल्यास ते नक्की पूर्ण होतात.

5) संकल्प हा व्यवहारिक असला तर आपला आर्थिक नुकसान होणार नाही हा विचार समोर ठेवून आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करु.

निव्वळ मनाच्या शक्तीवर अवलंबून राहून चालत नाही, तर संकप्ल पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजनही करावं लागतं तरच ते पूर्णत्वास जातात.