Navratri 2020 Rangoli Design: उद्या म्हणजेच शनिवारपासून नवरात्री उत्सवास सुरुवात होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देवी मातेची पूजा, आराधना केली जाते. देवीचे अनेक भक्त या काळात उपवास करतात. शारदीय नवरात्रात घटस्थापना केली जाते. नवरात्रीत नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. हा नऊ दिवसांचा काळ अगदी भक्तीमय असतो. या काळात महिलांची रेलचेल पाहायला मिळते. नवरात्री उत्सवात रात्री महिला गरबा, दाडिंया नृत्य करतात. शास्त्राप्रमाणे नवरात्रीत नऊ वेगवेगळ्या रंगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे महिला या रंगाप्रमाणे वस्त्र परिधान करतात.
नवरात्री उत्सवात देवीसमोर तसेच अंगणात सुंदर रांगोळ्या काढण्याची प्रथा आहे. रांगोळीच्या माध्यमातून तुम्ही देवीची प्रतिमादेखील साकारू शकता. यंदा तुम्हालाही नवरात्री उत्सवानिमित्त तुमच्या अंगणामध्ये खास आणि सुंदर रांगोळ्या काढायच्या असतील तर खालील व्हिडिओज किंवा फोटोज तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Navratri 2020: नवरात्रीत अखंड ज्योती लावण्यासंदर्भातील 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)
दरम्यान, नवरात्र हा वर्षातील असा काळखंड आहे जो रंग, परंपरा, गायन आणि नृत्यांनी समृद्ध आहे. या उत्सवामागे अध्यात्मदेखील आहे. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून देवीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय. यंदा या उत्सवावर कोरोना विषाणूचं महासंकट आहे. त्यामुळे यावर्षी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.