Navratri 2020: नवरात्रीत अखंड ज्योती लावण्यासंदर्भातील 'हे' नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
Diya (Photo Credit - Wikipedia.org)

Navratri 2020: उद्या म्हणजेचं 17 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. असं म्हटलं जात की, नवरात्रात अखंड ज्योत (Akhand Jyoti) पेटविली पाहिजे. ही ज्योत 9 दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये देवीसमोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे महत्त्वपूर्ण कारण आहे. असा विश्वास आहे की, अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्याभोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेचं देवीच्या भक्तांनादेखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं. नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात. याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुषदेखील नऊ दिवसांचा उपवास पकडतात.

नवरात्रीच्या काळात महिला साज-श्रृंगार करून गरबा, दाडिंया खेळतात. नवरात्री उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याचीदेखील परंपरा आहे. याशिवाय या काळात लावण्या जाणाऱ्या दिव्याचेदेखील विशेष महत्त्व आहे. देवीमातेसमोर लावण्यात आलेला हा दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो. (हेही वाचा - Navratri Fast Recipes: नवरात्रीत यंदा उपवासासाठी बनवा राजगि-याचे थालिपीठ, फराळी पॅटिस यांसारख्या 'ह्या' खमंग आणि हटके रेसिपीज, Watch Video)

नवरात्रीत अखंड ज्योत जाळण्याचे नियम -

  • नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा. यासाठी
  • आपण मातीपासून बनवलेला दिवादेखील निवडू शकता.
  • माती आणि पितळाचे दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात.
  • अखंड दिवा नेहमी उंच ठिकाणी ठेवा. हा दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका.
  • पूजेचा दिवा लावण्यापूर्वी सपाट किंवा स्टूलवर उंच ठिकाणी ठेवण्यापूर्वी गुलाल किंवा तांदळाने अष्टदल बनवा.
  • नवरात्रातील या अखंड दिव्याची वात रक्षा सूत्राने बनली जाते.
  • ही वात बनवण्यासाठी दीड हात संरक्षण धागा घ्या आणि त्याची वात बनवा. ही वात दिवाच्या मध्यभागी ठेवा.
  • तुम्ही या दिव्यात तूप, मोहरी किंवा तीळाच्या तेलाचा वापर करू शकता.
  • तुम्ही जर तूपाचा दिवा लावत असाल तर, तो देवीच्या उजव्या बाजूस ठेवावा. तसेच जर दिवा तेलाचा असेल तर, तो देवी देवीच्या डाव्या बाजूला ठेवला पाहिजे.
  • हा अखंड दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती, देवीमाता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करायला हवे.

टीप - या लेखात कोणतीही माहिती अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांद्वारे / ज्योतिषी / पंचांग / प्रवचन / विश्वास / शास्त्रवाचनांकडून संकलित करुन देण्यात आलेली आहे. आमचा हेतू केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणे हा आहे. यास सल्ला समजू नये.