National Science Day 2024: राष्ट्रीय विज्ञान दिनाची तारीख, इतिहास आणि साजरा करण्याचा उद्देश, जाणून घ्या
C. V. Raman (Photo Credits-Twitter)

National science day: विज्ञानाने मानवी जीवन अकल्पनीय मार्गाने सोपे केले आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीने सर्व काही साध्य करू शकतो. यावरून विज्ञान आपल्या जीवनात काय करू शकते याचा अंदाज बांधता येतो. वैज्ञानिक यश केवळ आंतरराष्ट्रीय स्तरापुरतेच मर्यादित आहे असे नाही. भारतीय शास्त्रज्ञही मागे नाहीत. भारतात  अनेक भौतिकशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत आणि अजूनही आहेत. असेच एक महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरामन होते, त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये अत्यंत दुर्मिळ शोध लावला. ज्याला त्यांच्या नावाने ‘रामन इफेक्ट’ किंवा रमन ‘स्कॅटरिंग’ असे नाव देण्यात आले. या शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत दर २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचा इतिहास

तामिळ भाषिक डॉ. सी.व्ही. रमण यांनी 1907 ते 1933 या काळात कलकत्ता (कोलकाता) येथील इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्समध्ये काम केले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी 'रामन इफेक्ट' शोधून स्पेक्ट्रोस्कोपी क्षेत्रातील महत्त्वाचे संशोधन पूर्ण केले. या महान कामगिरीसाठी त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

डॉ. सी.व्ही. रमण हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. भारताला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट होती. 1986 मध्ये, नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) ने भारत सरकारला 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून घोषित करण्याची शिफारस केली. भारत सरकारच्या संमतीने 28 फेब्रुवारी 1987 रोजी प्रथमच राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो?

*राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश भविष्यातील पिढ्यांना विज्ञानाची प्रेरणा देणे हा आहे.

* भारतीय शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा जगासमोर प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

* लोकांमध्ये वैज्ञानिक जागरूकता आणि समज वाढवणे.

* युवकांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

* सामान्य लोकांमध्ये वैज्ञानिक जागरूकता आणि समज वाढवणे.

* वैज्ञानिक प्रगती आणि नवकल्पना दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे.

* मानवजातीच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक विश्लेषण आणि शोधाचे महत्त्व अधोरेखित करणे.