
Nag Panchami Wishes in Marathi 2021: श्रावणाच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघराजवळ चिकटवून त्याचे पूजन करायची जुनी परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणात महिनाभर शिवपूजनाला ही अनन्य-साधारण महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रतांप्रमाणे श्रावणातील अनेक सण-उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर आले. तोच दिवस आपण नागपंचमी म्हणून साजरा करतो.(Naag Panchami 2021 Mehndi Design: नागपंचमी निमित्त हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन्स)
सर्पाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. या दिवशी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या सर्व प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक "नाग" हे आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. यंदाच्या नागपंचमी निमित्त मराठमोठ्या शुभेच्छापत्र, Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post च्या माध्यमातून द्या शुभेच्छा. (Nag Panchami 2020 Special Recipes: नागपंचमी निमित्त घरच्या घरी बनवा ज्वारीच्या लाह्या, खीर कान्होले, गोड खांडवी सारखे हे स्वादिष्ट पदार्थ!)
-मान ठेवूया नाग राजाचा,
पूजा करुन शिवशंकर भोले देवाचा
नागपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा!

-देवतांचे देवता महादेव, भगवान विष्णूचे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले, त्या सर्प देवाला माझा नमस्कार. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-वसंत ऋतुच्या आगमनाने, कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या मंगलदिनी, सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवनी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-बळीराजाचा हा कैवारी,
नागराजाची मुर्ती पुजूया घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

-रक्षण करुया नागाचे
जतन करुया निसर्गाचे
सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढतात किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करतात. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करण्याची जुनी प्रथा आपल्या कडे आहे.