Naag Panchami 2021 Mehndi Design: नागपंचमी निमित्त हातावर काढा 'या' सुंदर आणि सोप्या मेहंदी डिझाईन्स
Mehandi Designs (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वीच श्रावण या प्रवित्र महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक सण, व्रत वैकल्य केली जातात. या महिन्यात महिलांना मेहंदी काढण्यासाठी खुप क्षण असतात. मेहंदी केवळ या नवीन काळातच नव्हे तर फार पूर्वीपासून काढली जात आहे.आजही मुली आणि स्त्रिया मोठ्या आवडीने मेहंदी काढणे पसंत करतात. फक्त मुली आणि स्त्रियाच नाही तर बऱ्याच ठिकाणी शुभ समारंभाला पुरुषांनाही मेहंदी काढली जाते.जसे कोणत्याही शुभ आणि आनंदाच्या प्रसंगी रांगोळी काढली जाते त्याप्रमाणेच मेहंदीलाही आनंद साजरा करण्याचे प्रतीक मानले जाते.अवघ्या काही दिवसांवर नागपंचमी सण साजरा केला जाणार आहे.या दिवसाचे औचित्य साधुन तुम्ही ही हातावर मेहंदी काढण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास नागपंचमी साठी काढता येतील अशा मेहंदी डिझाईन्स. (Mangalagaur 2021 Puja VIdhi: मंगळागौर पूजन कसे कराल? जाणून घ्या विधी आणि महत्त्व )

नागपंचमी स्पेशल मेहंदी डिझाइन

नागपंचमी मेहंदी डिझाइन

सोपी मेहंदी डिझाइन

नागपंचमी स्पेशल सोपी मेहंदी डिझाइन

येत्या 13 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात नाग पंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी नागदेवतेची पुजा केली जाते. तसेच नागदेवतेला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य ही दाखवला जातो.