
आज देशभरात विशेषत: महाराष्ट्रात नागपंचमीचा (Nag Panchami) उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यंदा कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सावट महाराष्ट्राभोवती घोंगावत असल्या कारणाने अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने हा सण साजरा केला जात आहे. नागपंचमी म्हटलं की 'बत्तीस शिराळा' (Battis Shirala) या गावाता आवर्जून उल्लेख केला जातो. सांगलीपासून (Sangli) 60 किमी अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे गाव. हा गावात ख-या नागांना पकडून त्यांची पूजा केली जायची. मात्र सध्या शासनाच्या नियमांमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नागाची प्रतिकात्मक मूर्तीची पूजा केली जाते.
ख-या नागांना पकडून त्यांची नीट पाहुणाचार करून त्याची पूजा केली जायची. स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. त्यामुळे या सणादिवशी बत्तीस शिराळा गावात एक वेगळाच उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळायचा.
जाणून घेऊया बत्तीस शिराळा गावाविषयी आणि तेथे साजरी होणा-या नागपंचमी सणाविषयी:
1. पहिलं गावचे नाव श्रीयालय असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील 32 खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता, म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले. Nag Panchami 2020 Special Recipes: नागपंचमी निमित्त घरच्या घरी बनवा ज्वारीच्या लाह्या, खीर कान्होले, गोड खांडवी सारखे हे स्वादिष्ट पदार्थ!
2. या गावापासून जवळच चांदोली अभयारण्य आणि धरण आहे.
3. नागपंचमी सणाकरिता पूर्वीच्या काळी शिराळा गावातील लोक एक महिना अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडण्यासाठी जायचे. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन 5-6 तरुणांचा ग्रुप मोहिम फत्ते करत असे. पकडलेल्या नाग, साप, धामणी यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.
4. त्यांचा छान पाहुणचार करुन नागपंचमी दिवशी गावातील ग्रामदेवतेची पुजा करुन साधारणपणे 100-125 नागांची एकाच वेळी मिरवणुक काढली जाई. Nag Panchami 2020 Messages: नागपंचमी सणानिमित्त मराठमोळे शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes शेअर करुन साजरा करा श्रावणातील पहिलावहिला सण!
5. त्यानंतर नागाचे खेळ आयोजीत केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग पकडलेल्या मंडळाना बक्षिसे देत असत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरीक येत असत.
मात्र अशा रितींमुळे सापांचे, नागराचं प्रचंड हाल व्हायचे हे पाहून निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार 2002 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवण्याला बंदी केली. मात्र यामुळे या गावातील परंपरेत कोणताही खंड पडला नाही. हे लोक त्यानंतर नागाची प्रतिकात्मक मूर्ती घेऊन त्यांची मिरवणूक काढू लागले. हा उत्सव आजही तितक्याच आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे.