मदर तेरेसा (Mother Teresa) म्हणजेच Anjezë Gonxhe Bojaxhiu या रोमन कॅथलिक नन होत्या. 26 ऑगस्ट 1910 दिवशी त्यांचा जन्म झाला होता. यंदा त्यांच्या जयंतीचं 111 वं वर्ष आहे. जगाला शांततेचा विचार देणार्या आणि त्या दृष्टीने प्रसार करणार्या मदर टेरेसा यांना 'नोबेल पुरस्कार' तसेच भारताच्या 'भारतरत्न' या पुरस्काराने गौरवले आहे. दया, शांतता, करूणा यांचा प्रसार करताना त्यांनी जगभरातील आबालवृद्धांना मदत केली. जॉन ग्राफ क्लुक्स यांनी लिहलेल्या त्यांच्या चरित्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मदर तेरेसा लहान पणापासूनच 'मिशनरी जीवन' बाबत प्रभावित होत्या. त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षीच आपण 'मानव सेवा' संबंधित क्षेत्रात काम करणार असल्याचं ठरवलं होतं. 18व्या वर्षी त्या जेव्हा विटिना लेटनाईस च्या ब्लॅक मेडोना च्या समाधी स्थळावर प्रार्थना करत होत्या तेव्हा त्यांचा इरादा अधिक मजबूत झाला. नक्की वाचा: Mother Teresa Birth Anniversary: मदर टेरेसा यांचे शांती, करूणा चे संदेश देणारे बहुमूल्य विचार!
मदर टेरेसा यांचं भारतामध्ये येऊन काम करण्याचं ठरलं. तेव्हा त्यांचं वय अवघं 19 वर्ष होतं. भारतात येण्यापूर्वी 1928 मध्ये आर्यलंड च्या इंस्टिट्युट ऑफ ब्लेस्ड वर्जिन मेरी मध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला. येथील सदस्यांना 'सिस्टर्स ऑफ लोरेटो' म्हणतात. यामागे त्यांचा उद्देश इंग्रजी शिकण्यासोबतच मिशनरी बनवणं हा देखील होता. भारतामध्ये 'सिस्टर्स ऑफ लोरेटो' इंग्रजीमध्येच काम करत होत्या.
आर्यलंड मध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचा त्याग केला. 1929 मध्ये त्या भारतात आल्या आणि सुरूवातीला प्रशिक्षण काळात त्या दार्जलिंग मध्ये राहिल्या. त्यांनी बंगाली भाषेचं शिक्षण घेतलं. 1931 मध्ये त्यांनी पहिली धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यांचं नाव एक्नेस होतं पण भारतात आल्यानंतर त्यांनी टेरेसा नाव निवडलं.त्यांना आपल्या नावातून 'संत थेरेस ऑस्ट्रेलिया' आणि 'टेरेसा ऑफ अविला' यांना सन्मान द्यायचा होता.
भारतात त्यांनी गोर गरिबांची सेवा केली. लोरेट कॉन्वेंट स्कूल मध्ये शिक्षिका, हेडमिस्ट्रेस म्हणून काम केले. समाजकार्य सुरू ठेवतानाच सरकारी अधिकारी ते चर्च पर्यंत त्यांच्या कार्यांची चर्चा झाली. पुढे चर्च कडून मिशिनरीज ऑफ चॅरिटी उघडण्याची परवानगी मिळाली.
हळूहळू देशा-परदेशात त्यांची कीर्ती पोहचली. 1979 मध्ये नोबेलचा शांती पुरस्कार मिळाला. 1997 मध्ये कोलकाता मध्ये त्यांचं निधन झालं.