Mirza Ghalib (Photo Credits: Wikimedia Commons)

प्रेम, आयुष्य, भावभावना या साऱ्या पैलूंना शब्दांच्या गुंफणात जोडून एक वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या मिर्झा गालिब (Mirza Ghalib)  यांची आज मरणोत्तर 222वी जयंती आहे.  असद-उल्लाह बेग खान उर्फ मिर्झा गालिब यांचा 27 डिसेंबर 1797 रोजी जन्म झाला होता. आपल्या आयुष्यातील काही काळ मुघल सुलतान बहादूर शाह ज़फर यांच्या दरबारात शायर म्ह्णून त्यांनी काम केले होते त्या काळात लिहिलेल्या अनेक शेरोशायरी आजही हिंदी (Hindi), उर्दू (Urdu)  आणि फारसी (Persian) भाषेतील प्रमाण मानल्या जातात. असं म्हणतात, गालिब हे विद्वानांचे शायर होते त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शेराचा अर्थ सामन्यांना समजेल असे सांगता येत नाही, इतकेच काय तर कित्येकदा बड्या बड्या विद्वानांना देखील त्यांच्या शब्दांचे अर्थ समजण्यासाठी अडचण येत असे. पण जेव्हा या अर्थाचे आकलन व्हायचे तेव्हा मात्र त्याची अनुभूती स्वर्गीय असायची. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण असेच काही स्मरणात राहणारे शेर पाहणार आहोत.

मिर्झा गालिब यांनी प्रेम, दुःख, विरह, मद्य, खुदा, आत्मा, या शब्दातून अनेक शेर लिहिले आहेत,एकाच शब्दाचे वेगळे रूप पाहण्यासाठी हे शेर एकदा नक्की वाचून पहा...

1) उन के देखे से जो आ जाती है मुँह पर रौनक़

वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है

2 ) इस सादगी पे कौन न मर जाए ऐ ख़ुदा

लड़ते हैं और हाथ में तलवार भी नहीं

3) न सुनो गर बुरा कहे कोई,

न कहो गर बुरा करे कोई !!

रोक लो गर ग़लत चले कोई,

बख़्श दो गर ख़ता करे कोई !!

4) मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का

उसी को देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले

5) हम जो सबका दिल रखते हैं

सुनो, हम भी एक दिल रखते हैं

6) हैं और भी दुनिया में सुख़न-वर बहुत अच्छे

कहते हैं कि 'ग़ालिब' का है अंदाज़-ए-बयाँ और

7) ‏मुहब्बत में उनकी अना का पास रखते हैं,

हम जानकर अक्सर उन्हें नाराज़ रखते हैं !!

8) तुम न आए तो क्या सहर न हुई

हाँ मगर चैन से बसर न हुई

मेरा नाला सुना ज़माने ने

एक तुम हो जिसे ख़बर न हुई

9) नज़र लगे न कहीं उसके दस्त-ओ-बाज़ू को

ये लोग क्यूँ मेरे ज़ख़्मे जिगर को देखते हैं

10) दर्द जब दिल में हो तो दवा कीजिए

दिल ही जब दर्द हो तो क्या कीजिए

या मॉडर्न भाषेच्या काळात अजूनही एका खास वर्गामध्ये दिसून येणारी उर्दू भाषेची गोडी ही गालिब यांच्या शायरीचे यश आहे.