Maharashtra Day 2019 Marathi Great Personalities: भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन 1956 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. मुंबई नाकारल्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले. याच्या निषेधार्थ मुंबई मध्ये कामगारांचा एक विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठी चार्ज करण्यात आला. लाठी चार्जने आंदोलन दडपता आले नाही तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला. या गोळीबारात 105 आंदोलक शहीद झाले. या हुतात्मांच्या बलिदाना आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घ्यावे लागले आणि अखेर 1 मे 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यामुळे 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन हा प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा दिवस. या अभिमानाच्या दिनानिमित्त जाणून घेऊया मराठीतील काही थोर, दिग्गज व्यक्तिमत्त्वांबद्दल...
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांचे तर फक्त नावच पुरेसे आहे. यांच्या थोर आणि अचाट कार्य वर्णन करण्यास शब्द अपूरे पडतात. महाराष्ट्रातील नव्हे तर देशाभरातील जनतेच्या मनात अढळ स्थान असणारा असा हा आदर्श राजा. महाराष्ट्राचे दैवतच. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या या राजाला महाराष्ट्र दिनानिमित्त मानाचा मुजरा. ('महाराष्ट्र दिना'च्या शुभेच्छा WhatsApp, Facebook Status च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि शुभेच्छापत्रं!)
सावित्रीबाई फुले
स्त्रिला सामाजिक महत्व मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी अत्यंत प्रयत्न केले आणि स्त्री शिक्षण चळवळीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. समाजाच्या विरोध पत्करुन, अनेक हालअपेष्टा सहन करुन त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. सावित्रीबाई पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.
आनंदीबाई जोशी
पतीच्या हट्टामुळे शिक्षणाला सुरुवात केलेल्या आनंदीबाईंना नंतर अभ्यासात इतका रस निर्माण झाला की त्यांनी थेट विलायतेस जावून डॉक्टरेट मिळवली. अनेक कठीण प्रसंग आणि घोर संकटे यांवर मात करीत त्यांनी डॉक्टरीचा प्रवास पूर्ण केला. अन् देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. (नक्की पहा: महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोठी गीते)
लता मंगेशकर
भारतातील एक थोर गायिकाचे मान मिळवणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज अजूनही सर्वांना मंत्रमुग्ध करतो. गानकोकीळा म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठी, हिंदीसह त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर हिंदी चित्रपटसृष्टीत 980 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या या भरीव कार्याबद्दल त्यांचा भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महार कुटुंबात त्यांचा जन्म झाल्यामुळे जातिभेद, अस्पृश्यता या गोष्टी साहजिकच त्यांच्या वाट्याला आल्या. मात्र आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. त्यासाठी चळवळ सुरु करुन 1924 साली त्यांनी बहिष्कृत हितकारिणी या संस्थेची स्थापना केली. तरुणांना त्यांनी शिक्षणाचे, स्वावलंबनाचे, स्वच्छतेचे धडे दिले. 990 साली त्यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले.
सचिन तेंडूलकर
केवळ भारतीयांना नव्हे तर देशा-परदेशातील अनेक क्रिकेटप्रेमींना वेड लावणारे असे हे व्यक्तिमत्त्व. क्रिकेट या खेळावरील आपले प्रेम आणि निष्ठा यामुळे क्रिकेट विश्वात अनेक विक्रम रचत सचिन क्रिकेटचा देव झाला. सचिन जितका चांगला क्रिकेटर तितकाच चांगला माणून म्हणूनही लोकप्रिय आहे. अनेक भावी क्रिकेटर्सचे प्रेरणास्थान असलेला सचिन तेंडूलकर हा महाराष्ट्राचा मान आणि शान आहे.
यांसारख्या अनेक दिग्गजांनी मराठीचा झेंडा अटकेपार रोवला. मराठी माणसाचा अभिमान आणि विश्वास वाढवला. या थोर व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणेने आपणही आपल्या क्षेत्रात भरारी घेण्याचे स्वप्न बाळगूया.