Maharashtra Din 2019 Marathi Wishes: 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या लढ्यामधून स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. यंदा 59 वा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी मराठी माणसाची मागणी होती. ती अखेर 107 जणांच्या बलिदानानंतर पूर्ण झाली. या लढ्याला सलाम, महराष्ट्रीय असल्याचा अभिमान बाळगत आज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा (Maharashtra Din Wishes) नक्की शेअर करा. प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वातंत्र्याचा हा दिवस शुभेच्छांशिवाय अपूर्णच ठरेल. त्यामुळे या खास दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी भाषेतील SMS, Wishes, Quotes, Images आणि शुभेच्छापत्रं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हे संदेश शेअर करुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना देऊ शकता...
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !!!
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
कपाळी केशरी टिळा लावीतो
महाराष्ट्र देशा तुला वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
दगड झालो तर 'सह्याद्रीचा' होईन!
माती झालो तर 'महाराष्ट्राची' होईन!
तलवार झालो तर 'भवानी मातेची' होईन!
आणि…
पुन्हा मानवाचा जन्म मिळाला तर 'मराठीच' होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा व्हिडिओ:
तुमच्या नातेवाईक, आप्तेष्ठांना शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्रं, संदेश तुम्हाला नक्कीच आवडले असतील, अशी आशा आहे. तुम्हाला सर्वांनाही महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!