Maharashtra Bendur 2022 HD Images: महाराष्ट्रीय बेंदूर Wishes, Images, Messages शेअर करत साजरा करा बळीराजाचा सण, शेतकरी बांधवांना द्या शुभेच्छा

बेंदूर (Bendur) हा सण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा सण आणि त्यातही शेतकऱ्याचे खरे सोबती, जोडीदार असलेल्या बैलांचा जण म्हणून ओळखला जातो. हिंदू पंचागानुसार बेंदू सण (Bendur Festival) आषाढ महिन्यात शुद्ध त्रयोदशीला महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिवशी बैलांची विशेष काळजी घेतली जाते. बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालतात. त्याला घासून पुसून स्वच्छ करतात. बैलांना पूजण्याची, सजविण्याची सुद्धा एक खास अशी पद्धत असते. या दिवशी शेतकरी बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. या खास दिवशी (Bendur Festival 2022) आदी माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes इथून डाऊनलोड करु शकतात.

बेंदुर सणाच्या आदल्या दिवशी खांदेमळणी असते. या दिवशी संध्याकाळी बैलांचे खंदे गरम पाण्याने शेकले जातात. त्यानंतर त्याला हळद लावून ते मळले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना अंघोळ घातली जाते. केवळ बैलांनाच नव्हे तर शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या सर्व जनावरांना अंघोळ घालतात. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी जनावरांना केवळ हिरवा चाराच दिला जातो. अगदीच दुष्काळ असेल तर त्यात बदल होतो. अन्यथा जनावरांना या दिवशी हिरवा चारा देण्यावर भर दिला जातो. बैलांना आंघोळ घातल्यानंतर त्याच्या अंगावर रंगांचे पट्टे ओढले जातात. काही लोक त्याच्या अंगावर रंगीत छापही उठवतात. नंतर त्याच्या पाठीवर झूल घालून शिंगांना बेगडी लावतात. त्याच्या डोक्यावर बाशिंग आणि गळ्यात चाळ (घुंगराची माळ) घातली जाते.

संपूर्ण वर्षभर बैल शेतकऱ्याला मदत करत असतात. अशा वेळी एक दिवस त्याला हक्काची विश्रांती हवी म्हणून बैलपोळा म्हणजेच बेंदुर सण साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी बैलांना हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करून,पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून तीच पुरण पोळी बैलांना खायला देण्याची पद्धत आहे. कर्नाटकात या सणाला पोळा असे म्हणतात तर महाराष्ट्रात या सणाला महाराष्ट्रीय बेंदूर असे म्हणतात. बंदूर सणादिवशी बैलांना पूजा करुन त्याला गावदेवासाठी नेले जाते. हा सर्व लवाजमा गावच्या वेशीत पोहोचतो तेव्हा गावकरी बैलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करतात.