Bendur 2020: कोल्हापूर मध्ये आज कर्नाटकी बेंदूर; यंदा महाराष्ट्रात बैलपोळा आणि बेंदूर कधी साजरा होणार आणि त्याचे महत्व काय?
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

Importance & Date Of Bendur 2020: बेंदूर (Bendur 2020)  हा सण मध्य आणि दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnatak), छत्तीसगड (Chhatisgarh), महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बेंदूरच्या प्रसिद्ध सणाला अनेक ठिकाणी बैलपोळा (Bailpola) म्हणून संंबोधले जाते. गावाखेड्यात या सणांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. यादिवशी शेतकरी आपल्या गुराढोरांबद्दल प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतात. हा सण कर्नाटक आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या दिवशी साजरा होतो. कर्नाटक मध्ये जुन महिन्यातील पौर्णिमेला तर महाराष्ट्रात साधारण ऑगस्ट मध्ये हे सेलिब्रेशन होते. यंंदा कर्नाटक भागात शनिवारी 6 जुन पासुन हे सेलिब्रेशन सुरु झाले आहे,आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषेवरील कोल्हापुर सहित काही गावांमध्ये बेंदूर साजरा केला जात आहे. बेंदुर या सणाची खासियत आणि महाराष्ट्रातील बेंंदुर/पोळा सणाची तारिख याविषयी सविस्तर जाणुन घेउयात..

आजच्या या बेंदूर/पोळा सणाच्या निमित्ताने कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी ट्विटरच्या माध्यमातुन बैलासोबत फोटो शेअर करुन सर्वांंना खास बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.बेंदूर सणाच्या शुभेच्छा मराठी Images, WhatsApp Status, Messages, शुभेच्छापत्रं!

धनंंजय महाडिक ट्विट

बेंंदुर सणाचे महत्व

महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो.या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. असं म्हणतात शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, आणि ज्याच्या जीवावर त्याला हा मान मिळाला आहे त्या गुरांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सण आहे. या दिवशी बैलांना आराम दिला जातो, साधरणतः नांगराला जुंपलेला बैल या दिवशी खास आंघोळ घालून, रंगीत झालर लावून, शिंग रंगवून सजवला जातो, त्याला गोडाधोडाचे जेवण दिले जाते, त्याची पूजा केली जाते.

यंदा बैलपोळा कधी?

संपूर्ण महाराष्ट्रात सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला बेंदुरच्या स्वरुपातील बैलपोळा साजरा केला जातो. यंदा 19 ऑगस्ट रोजी बैलपोळा आहे.

दरम्यान, केवळ सणांच्या दिवशीच प्राण्यांवर प्रेम करणे असे काही गरजेचे नाही. आपल्याला शक्य त्या प्रत्येक पद्धतीने मदतच करणाऱ्या या मुक्या जीवांना दरदिवशी प्रेमाने वागवणे जमल्यास तीच खरी माणुसकी ठरेल.