Maharana Pratap Jayanti 2024 HD Images: महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त खास Messages, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून द्या शुभेच्छा!
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images (File Image)

Maharana Pratap Jayanti 2024 HD Images In Marathi: प्रसिद्ध राजपूत योद्धा आणि राजस्थानमधील मेवाडचे राजे महाराणा प्रताप सिंग (Maharana Pratap Singh Jayanti 2024) यांची आज जयंती. राजपूत शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे, 1540 रोजी राजस्थानच्या पाली जिल्ह्यात झाला. काही ठिकाणी त्यांचे जनस्थळ कुंभलगड असेही नमूद आहे. राजस्थानमधील इतर राजपूत शासकांप्रमाणेच, महाराणा प्रताप यांनीही मुघलांच्या अधीन होण्यास नकार दिला आणि आपल्या मातीसाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. अकबराशी मुकाबला करणारे ते ते पहिले राजपूत योद्धा होते. पुढे महाराणा प्रताप यांची ही धोरणे ब्रिटिशांविरुद्ध बंगालच्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली.

महाराणा प्रताप यांचे बालपण भिल्ल समाजासोबत गेले व त्यांच्यासोबतच ते युद्धकला शिकले. वडिलांच्या मृत्युनंतर महाराणा प्रताप यांनी 1 मार्च 1572 रोजी वयाच्या 32 व्या वर्षी मेवाडच्या राजघराण्याची गादी स्वीकारली. राजपदावर बसल्यानंतर अतिशय पराक्रमाने आणि कुशलतेने त्यांनी राज्यकारभार चालवला. एक कुशल योद्धा संघटक व राजकारणनिपुण असा राज्यकर्ता म्हणून त्यांनी आपला लौकिक निर्माण केला.

महाराणा प्रताप यांनी अकबरला युद्धात तीन वेळा हरवले होते. 1577, 1578, 1579 अशा सलग तीन वर्षे झालेल्या युद्धात त्यांनी अकबरला मात दिली होती. खास करून हल्दीघाटी आणि दिवरच्या लढाईतील त्यांच्या पराक्रमाची आजही आठवण काढली जाते. साधारण 1572 पासून 1597 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत ते मेवाडच्या सिसोदियाचे शासक राहिले.

तर अशा या महान योध्याच्या जयंतीनिमित्त खास Images, Messages, Greetings, Quotes, Wallpapers  शेअर करत द्या शुभेच्छा.

Maharana Pratap Jayanti 2024 HD Images
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images
Maharana Pratap Jayanti 2024 HD Images

दरम्यान, महाराणा प्रताप यांना 11 पत्नी आणि एकूण 17 मुले व 5 मुली होत्या. 1597 साली शिकार करायला गेलेल्या महाराणा प्रताप यांचा अपघात झाला आणि 19 जानेवारी 1597 रोजी त्यांनी प्राणत्याग केला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 57 वर्षे होते. महाराणा प्रताप यांच्यानंतर महाराणा अमर सिंह प्रथम हे त्यांचे उत्तराधिकारी बनले. (हेही वाचा: Akshaya Tritiya 2024 Rangoli Designs: अक्षय तृतीयेला घराच्या अंगणात काढा 'या' सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स; Watch Video)

राजस्थानमध्ये महाराणा प्रताप जयंती ही सार्वजनिक सुट्टी आहे. या ठिकाणी महाराणा प्रताप यांच्या सन्मानार्थ मिरवणुका आणि रॅली काढल्या जातात. उदयपूर आणि चित्तोडगडमध्ये विशेष पूजा आणि उत्सवांसह हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही सार्वजनिक सुट्टी असते.