Lokmanya Tilak Punyatithi 2020 Quotes: "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारचं," अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणून ओळखले जातात. बाळ गंगाधर टिळक भारतिय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटीश अधिकारी त्यांना "भारतीय अशांततेचे जनक" म्हणत. त्यामुळेचं त्यांना "लोकमान्य" ही पदवी देण्यात आली.
बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै ला 1856 साली रत्नागिरीत एका चित्पावन ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांचे मुळगांव कोकणातील चिखली हे होते. टिळकांचे वडिल एका शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत होते व संस्कृताचे चांगले ज्ञानी होते. टिळक अवघे 16 वर्षांचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यु झाला. आज त्यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी होत आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे काही अनमोल विचार तुमच्या जीवनाला योग्य दिशा नक्की देतील. (हेही वाचा - Happy Friendship Day 2020 Messages: मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आपल्या जिवलग मित्रांना करा खूश!)
"जेथे बुद्धीचे क्षेत्र संपते तेथे श्रद्धेचे क्षेत्र सुरू होते."
"एक जुनी म्हण आहे की जे स्वत: ला मदत करतात त्यांना देव मदत करतो."
"मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही! उत्सवांवर प्रेम करणे हा मानवी स्वभाव आहे! आपण आपले सण जपले पाहिजेत."
"यश हे पाच प्रमुख घटकांपैकी एक आहे. ईश्वरदत्त ही एक संधी आहे जी आपणास लाभ घेण्याची आहे."
"परमेश्वर अस्पृश्यता मानत असेल तर मी परमेश्वरमध्ये नाही मानत."
टिळकांनी 1877 साली डेक्कन महाविद्यालयातुन पदवी प्राप्त केली. 1879 साली गव्र्हमेंट लॉ काॅलेज मधुन वकिलीची पदवी मिळवीली. त्यानंतर त्यांनी एका खाजगी शाळेत गणित शिक्षक म्हणून कार्य सुरू केले. पुढे त्यांनी पत्रकार म्हणूनदेखील काम केलं. त्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला. टिळकांनी महाविद्यालयातील मित्र महादेव बल्लाळ नामजोशी, गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळुणकर यांच्यासमवेत 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश भारतात शिक्षणाचा प्रसार करणे व युवकांना नवी प्रेरणाशक्ती देणे हा होता.