Happy Friendship Day 2020 Messages: मैत्री दिनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आपल्या जिवलग मित्रांना करा खूश!
या दिवसाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या मित्र मैत्रिणींना मेसेजेस च्या माध्यमातून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा द्या. यंदा लॉकडाऊन मुळे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने घरात राहून मोबाईलच्या माध्यमातून छान शुभेच्छा संदेश पाठवा.
Friendship Day Marathi Messages: आयुष्यामध्ये बरीचशी नाती आहेत ही जन्मत:च मिळतात. तर काही नाती जोडली जातात मानली जातात पण त्या सर्व नात्यांपैकी 'मैत्री' हे नात सगळ्यात ग्रेट असत. हे नातं रक्ताचं नसलं तरीही आपल्या सुख-दु:खांना सामावून घेऊन एक एनमोल नातं असतं. या नात्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day) साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या लाडक्या मित्र मैत्रिणींना मेसेजेस च्या माध्यमातून फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा द्या. यंदा लॉकडाऊन मुळे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने घरात राहून मोबाईलच्या माध्यमातून छान शुभेच्छा संदेश पाठवा.
यासाठी तुम्हाला गरज असेल ती छान शुभेच्छा संदेशाची! जी वाचून तुमच्या मित्रपरिवाला छान वाटेल. यासाठी तुमच्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश:
असं नातं जे नकळतं निर्माण होतं,
मात्र आयुष्यभरासाठी कायम लक्षात राहतं
दोस्ती, मैत्री, फ्रेंडशिप अशी कित्येक नावे आहेत त्याला
जे जगातील सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ नातं असतं.
हॅप्पी फ्रेंडशिप डे!

हेदेखील वाचा- Friendship Day 2020: फ्रेंडशीप डे निमित्त घराच्या घरी Friendship Bands कसे बनवाल?
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री एक अमूल्य भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्यात कोणत्या Relationship मध्ये नसलात तरी चालेल
पण आयुष्यात Friendship हे नाते असलेच पाहिजे
कारण Relationship कधीतरी रडवतं
पण Friendship रडताना तुम्हाला भक्कम आधार देतं
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मोठे होता होता सरले बालपण
मैत्री मात्र आपली अशीच कायम राहिल
कालपण, आजपण आणि उद्यापण!
Happy Friendship Day

ज्या नात्यात बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते
दु:ख दाखविण्यासाठी आसवांची गरज नसते
न सांगता ज्याला सर्वकाही समजते
ते अतूट नाते मैत्रीचेच असते.
हॅप्पी फ्रेंडशिप डे!

मैत्री हे एक असं नातं आहे ज्यात बाकी सारी नाती एका बाजूला आणि मैत्रीचे ते गोड नातं एका बाजूला. मैत्रीच नातं हे खूप पवित्र असतं पण विश्वासघातामुळे मलीन होऊन जात, पण तोच विश्वास जरा टिकून राहिला तर मैत्रीचं हे नातं आयुष्यभर सारथी म्हणून राहतं. लेटेस्टली कडून फ्रेंडशिप डे च्या हार्दिक शुभेच्छा!
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2020 05:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

