भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज पहिली पुण्यतिथी. गानकोकीळेच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त (Lata Mangeshkar Death Anniversary) जगभरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. दरम्यान, वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक (Sand Artist Sudarsan Pattnaik) यांनी आपल्या कलेतून अभिनव पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुदर्शन पटनायक यांनी लता मंगेशकर यांचे खास वाळूशिल्प (Sand Sculpture of Lata Mangeshkar) उभारले आहे. जे अनेकांचे लक्ष वेधून गेतले आहे. ओडिशा येथील पुरी समुद्रकिनाऱ्यावर साकारलेले लता मंगेशकर यांचे वाळू शिल्प पर्यटक आणि रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
ओडिशातील पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर लाता मंगेशकर यांचे शिल्प उभारत सुदर्शन पटनायक यांनी म्हटले आहे की, 'भारतरत्न लता जी यांना श्रद्धांजली. 'मेरी आवाज ही पहलें है'. पटनायक यांनी आपल्या संदेशासह सुमारे 6 फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले. लता मंगेशकर यांचे पाठिमागील वर्षी 6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 92 व्या वर्षी निधन झाले. (हेही वाचा, Lata Mangeshkar Music College: मुंबईच्या कालिना परिसरात उभे राहणार लता मंगेशकर संगीत महाविद्यालय; सरकारने दिला 7,000 चौरस मीटरचा भूखंड)
लता मंगेशकर हे भारतीय संगीतामधील महतत्वाचे नाव. त्यांना लतादीदी म्हणूनही ओळखले जाते. संगिताचे अभ्यासक सांगतात ता दिदी हे हे एक असे नाव होते जे भारतात संगीताला समानार्थी होते. आपल्या प्रभावी, खोल आणि तितक्याच गोड आवाजाने त्यांनी संपूर्ण देशाला संगिताकडे वळवले. त्यांनी सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत भारतीय संगीत उद्योग आणि कलाविश्वात अमूल्य योगदान दिले. या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न आणि दादा साहेब फाळके यांसारखे महत्त्वाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लता मंगेशकर यांनी भारतीय संगीत क्षेत्रातील एका युगाचे, चळवळ आणि चिरस्थायी टप्प्याचे प्रतिनिधित्व केले. त्यांचा आवाज इतका ताकदवान होता की तो भाषा, जात, पंथ, संस्कृती, प्रांत, धर्म या सर्व अडथळ्यांना पार करत होता.
पाच भावंडांपैकी सर्वात मोठ्या लता यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमधील एका मराठी भाषिक कुटुंबात झाला, जो पूर्वी मध्य भारत एजन्सीचा भाग होता, परंतु आता मध्य प्रदेशात आहे. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि प्रसिद्ध नाट्य कलाकार होते.