Lalbaugcha Raja 2019: मुंबईमध्ये नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणारं लोकप्रिय सार्वजनिक गणपती मंडळ म्हणजे 'लालबागचा राजा'. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे 86 वं वर्ष आहे. आज (20 जून) दिवशी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागचा राजाच्या गणेशमूर्तीचं पाद्यपूजन होणार आहे. हा गणेश मुहूर्त पूजनाचा सोहळा भक्तांना लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत वेबसाईटसह फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. इथे पहा: ८५ वर्षातील लालबागच्या राजाचं बदलतं रूप
लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा
लालबागच्या राजाची मोहक मूर्ती दरवर्षी एकाच स्वरूपात साकारली जाते. आज या मूर्तीचं पाद्यपूजन करून पुढील सोहळ्यासाठी गणेशभक्त सज्ज होणार आहेत. लालबागच्या राजाच्या यंदाच्या पाद्यपूजन सोहळयाची क्षणचित्रं lalbaugcharaja.com या अधिकृत वेबसाईटवर पाहता येतील. सोबतच सोशल मीडियावर हा सोहळा पाहण्यासाठी -
फेसबूक - https://www.facebook.com/LalbaugchaRaja/
ट्विटर - @LalbaugchaRaja
इंस्टाग्राम - @Lalbaugcharaja
युट्युब - https://www.youtube.com/user/LalbaugRaja
लालबागचा राजा 2019 चं पाद्यपूजन आणि गणेश मुहूर्त पूजन सोहळ्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग
यंदा गणेशचतुर्थी 2 सप्टेंबर 2019 दिवशी आहे. त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन गणेशभक्तांसाठी 2 ते 12 सप्टेंबर2019 यादरम्यान खुलं राहील. सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटींचीदेखील या गणेश मंडळाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी असते.