Sankashti Chaturthi June 2019: यंदा 20 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ?
Lord Ganesha | Sankashti Chaturthi | (Photo Credits: Pixabay)

दर महिन्यात पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी 'संकष्टी चतुर्थी' म्हणून ओळखली जाते. या चतुर्थीचे गणेशभक्तांसाठी विशेष महत्त्व असते. यंदा गुरुवार, 20 जून रोजी म्हणजे आजच संकष्टी चतुर्थी आहे. गणपती आणि चंद्रांचे नाते सांगणारी ही चतुर्थी असल्याने या दिवशी चंद्राचे पूजन केले जाते. त्यामुळे यादिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व असते. आज संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचं पाद्यपूजन होणार आहे. येथे पहा लाईव्ह सोहळा

जून 2019 संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदयाची वेळ काय?

20 जून 2019 रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्रोदय रात्री 9.52 मिनिटांनी होणार आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त अनेक गणेशभक्त उपवास ठेवतात. त्यामुळे चंद्रोदयानंतर पूजा करुन चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडला जातो.

संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीला प्रिय असलेलं जास्वंदीच फूल, दुर्वा वाहून गणपतीची पूजा केली जाते. गोडाचा स्वयंपाक केला जातो. तर गणपतीसाठी खास उकडीचे मोदकही बनवले जातात.

गणपती ही विद्येची, कलेची देवता असून सर्व संकटे दूर करणारा विघ्नहर्ता आहे. त्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशाची पूजा केली जाते.