मुंबापुरीची शान म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सवाचा सोहळा आणि त्यातही लालबाग परळ मधील धामधूम हे एक सुपरहिट कॉम्बिनेशन आहे. दरवर्षी चिंचपोकळी, करीरोड या परिसरात अनेक मानाच्या मंडळांचे बापप विराजमान होत असतात. या साऱ्यांमध्ये लालबागच्या राजाची शान म्हणजे काही औरच असते. यंदाही गणेश चतुर्थीपासून ते अगदी आता अनंत चतुर्दशीला अवघे काहीच तास शिल्लक असतानाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठमोठ्या रंग लावून उभे आहेत. दरवर्षीच्या या गर्दीचा अंदाज घेत यंदा भाविकांचे कष्ट वाचवून घरच्या घरी बसल्या जागी केवळ एका क्लिकवर बाप्पाचे दर्शन घेता यावे यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक ग्णाइशोत्सव मंडळाने एक नामी शक्कल लढवली आहे. लालबागच्या राजा (Lalbaugcha Raja) मंडळाच्या सोशल मीडिया पेजेस वरून तुम्हाला थेट बाप्पाचे दर्शन घेता येऊ शकते. यामध्ये फेसबूक, ट्वीटरसह युट्युब चॅनल आणि अधिकृत वेबसाईटवरही 24 तास लालबागच्या राजाचे दर्शन घेणं शक्य आहे.
लालबागच्या राजाचं लाईव्ह मुखदर्शन मंडळाच्या अधिकृत युट्युब चॅनलवर उपलब्ध आहे.दिवसातून दोन वेळेस लालबागच्या राजाची आरती होते. दुपारी 12.30 आणि रात्री 8.30 वाजता बाप्पाची आरती होते.आज म्हणजेच 11 सप्टेंबर 2019 रात्री 12 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं दर्शन रांगेमधून घेता येणार आहे.(लालबागच्या राजाला एका निनावी भक्ताने अर्पण केली सोन्याचा मुलामा असलेली पावलं)
इथे पहा लालबागच्या राजा आरती व मुखदर्शनाचे लाईव्ह स्ट्रीमिंग
यंदा लालबागच्या राजा मंडळाचे 86 वे वर्ष आहे. लालबागच्या मार्केट मध्ये विराजमान झालेल्या या बाप्पाच्या सभोवताली यंदा नितीन चंद्रकांत देसाई यांनी ‘चांद्रयान 2’चा आगळावेगळा देखावा उभा केला आहे. भारताची चांद्रयान मोहीम आणि गणेशोत्सवाचा सोहळा याचा मेळ घालत हा देखावा साकारण्यात आला आहे. अंतराळवीर, मिसाईल्स यांचं मधोमध विराजमान बाप्पाला पाहिल्यावर आपणही अंतराळात असल्याचा भास होतो.