Lalbaugcha Raja (Photo Credits: File)

Lalbaugcha Raja: मुंबईतील 'लालबागच्या राजा' ची शान त्याचा थाट काही औरच आहे. यात राजाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या लाखोंच्या वर आहे. आपली साकडं राजापुढे मांडण्यासाठी किंवा आपले मागणे पुर्ण झाले म्हणून तो नवस फेडण्यासाठी आलेले हे भक्त राजाला सोन्या-चांदीच्या रुपात काही ना काही वस्तू अर्पण करतच असतात. मटाच्या वृत्तानुसार, आता राजा चरणी एका निनावी भक्ताने सोन्याचा मुलामा चढवलेली पावलं अर्पण केली आहेत. ही पावलं इतकी सुंदर आणि आकर्षक आहेत की, सध्या येथे येणा-या भाविकांमध्ये या पावलांची चर्चा सुरु आहे.

अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) 2 दिवसांवर आली असताना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणा-या भक्तांची संख्या देखील वाढत आहे. तसेच गणेश चतुर्थी निमित्त गावी गेलेल भाविकही मुंबईत परत आल्याने भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राजा येणा-या सोनं, चांदी यांसारख्या गोष्टींची रीघ सुरुच आहे. त्यातच रविवारी राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका निनावी भक्ताने राजा चरणी सोन्याचा मुलालमा असलेली चांदीची पावलं दान केली आहेत. ही पावलं तेथे येणा-या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. हेही वाचा-  Ganesh Utsav 2019: मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळ लालबाग, चिंतामणी, गणेश गल्लीसह 'या' 5 ठिकाणी कसे जायचे? याची माहिती मिळवा

आत्तापर्यंत बिग बी अमिताभ बच्चन, अंबनी परिवार, प्रसाद ओक, श्रेया बुगडे,अजिंक्य रहाणे, शिल्पा शेट्टी, उर्मिला मातोंडकर यांच्या सोबतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील महाराष्ट्र दौर्‍यावर असताना मुंबईत गणेश चतुर्थी दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लालबागच्या राजाला सामान्यां इतकीच सेलिब्रिटींमध्येही क्रेझ आहे. अनेक दिग्गज मंडळी नित्यनियमाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतात.