Lala Lajpat Ra| Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

लाला लजपत राय (Lala Lajpat Rai) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते. भारतीय लेखक, राजकारणी आणि तत्कालीन काँग्रेसचे महत्त्वाचे नेते. त्यांचा जन्म 28 जानेवरी 1865 तर 17 नोव्हेंबर 1928 रोजी झाला. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरोधात मोठे आंदोलन सुरु होते. याच आंदोलनाचा भाग असलेल्या सायमन कमीशन विरुद्ध काढलेल्या एका मोर्चात इंग्रजांनी लाठीमार केला. यात घाव वर्मी लागल्याने लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा 17 नोव्हेंबर रोजी मृत्यू (Lala Lajpat Rai Death Anniversary) झाला. त्यांचा मृत्यू झाला असला तरीही आजही त्यांचे विचार (Lala Lajpat Rai Thoughts) अनेकांना प्रेरणा देत असतात. आज त्यांचा बलिदान दिन (Lala Lajpat Rai Sacrifice Day). त्यानिमित्त जाणून घ्या त्यांचे विचार.

लाला लजपत राय विचार

  • इतरांवर नव्हे, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. मग पाहा यश कसे मिळते- लाला लजपत राय
  • सत्याची उपासना करुनही व्यक्तीगत लाभासाठी निंदा करण्याऐवजी परिश्रम करा. प्रामाणीक राहा- लाला लजपत राय
  • देशभक्तीचे निर्माणकार्य न्याय आणि सत्याच्या मार्गानेच पुढे जाऊ शकते- लाला लजपत राय
  • पराभव आणि अपयश हे विजयाच्यादिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असते- लाला लजपत राय
  • लहानांसाठी दूध, प्रौढांसाठी भोजन आणि सर्वांसाठी शिक्षण आवश्यक असते - लाला लजपत राय

(हेही वाचा, Balasaheb Thackeray Death Anniversary: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे: भूमिका आणि निर्माण झालेले वाद)

दरम्यान, लाला लजपत राय हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातील नेते नव्हते. त्यासोबतच ते सामाजिक परिवर्तनाचे प्रणेतेही होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी विमा कंपनी स्थापन केली. काँग्रेसच्या जहाल गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता. त्यामुळे लाल, बाल, पाल हे समिकरण भारतात प्रसिद्ध होते. लाल- लाला लजपत राय, बाल- बाळ गांगाधर टिळक, पाल- बिपीनचंद्र पाल अशी या तिघांची नावे आहेत.