Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2023: मराठा राज्यकर्त्यांमधली छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथा केवळ भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजही आदरास पात्र होते. त्यांचे संपूर्ण जीवन देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी समर्पित होते. लहानपणापासूनच ते वडील शिवाजी महाराजांसोबत रणांगणात उतरले आणि आपल्या राज्याच्या रक्षणासाठी युद्ध कलेत पारंगत झाले.
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक 2023 तारीख कधी आहे?
संभाजी महाराजही उत्तम राज्यकर्ते होण्यासाठी मुत्सद्देगिरीत पारंगत झाले. इतिहासाच्या पानात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने अनेक महान कर्तृत्वाची नोंद आहे. संभाजी महाराजांनी 16 जानेवारी 1681 रोजी आपला राज्याभिषेक केला. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतीच्या गादीवर विराजमान झाले होते. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas: कधी आहे बलिदान दिवस? जाणून घ्या, तारीख आणि संभाजी महाराजांबद्दल 10 प्रमुख तथ्ये, जाणून घ्या)
छत्रपती संभाजी राजे यांच्या राज्याभिषेकाचे महत्व
दरम्यान, 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांना मराठा साम्राज्याची गादी सोपवण्यात आली. हा दिवस मराठा साम्राज्यासाठी अभिमानाचा दिवस आहे, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शौर्य आणि पराक्रमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी अडचणीच्या काळात मराठा साम्राज्य ताब्यात घेतले.
तथापी, वयाच्या 18 व्या वर्षी ते युवराज बनले होते तर वयाच्या 23 व्या वर्षी छत्रपती बनले. छत्रपती संभाजी महाराजांनी 1681 ते 1689 पर्यंत मराठा सम्राट म्हणून राज्य केले. त्यांचा जन्म 14 मे 1657 आणि मृत्यू 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे झाला.