Kartiki Ekadashi 2020 Wishes in Marathi: कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीलाचं प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णु त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतुन जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्विकारतात असे मानतात. त्यामुळे हिला देवोत्थनी, देव उठी एकादशी असेही म्हणतात. यंदा 25 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीच्या व्रताचे पालन करण्यात येणार आहे.
वर्षात दोन मोठ्या एकादशी येतात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिकी एकादशी. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते. आषाढी एकादशीला वारकरी आळंदीहून पंढरपूरला जातात. तसेच कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरहून आळंदीस येतात. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे महात्म्य असते आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वरांचे महात्म्य असते. कार्तिकी एकादशी निमित्त HD Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून विठूरायाच्या भक्तांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या. (हेही वाचा - Vivah Shubh Muhurat 2020: यंदा तुळशी विवाहानंतर सरत्या वर्षाला निरोप पूर्वी लग्नबेडीत अडकण्यासाठी पहा नोव्हेंबर, डिसेंबर मधील विवाहाचे मुहूर्त!)
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा
ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
कार्तिकी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा!
तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
कार्तिकी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा!
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने|
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जातां पंढीरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटतांचि
या सुखा उपमा नाही त्रिभुवनी
पहिली शोधोनी अवघी तीर्थे
कार्तिकी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात. तसेच भजन-कीर्तनात दिवस घालवितात आणि विठ्ठलाची महापूजा करतात. कार्तिक एकादशीच्या दिवसापासून तुलसी विवाहासदेखील सुरुवात होते. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईचे दिवस सुरु होतात. या दिवशी पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करून त्याच्या नावाने उपवास केला जातो.