
Kartik Purnima 2018: महाराष्ट्रासह देशभरामध्ये आज कार्तिक पौर्णिमेचा(Kartik Purnima) उत्साह आहे. प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा (tripurari Purnima) आणि देव दिवाळीचा (Dev Diwali) उत्साह मुंबईतही पाहायला मिळाला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या पूर्व संध्येला वाळकेश्वर येथील बाणगंगा (Banganga) येथे दिव्यांची आरास करण्यात आली होती. यामुळे सारा परिसर झगमगत होता. भाविक येथे श्रद्धेने दिव्यांची आरास करतात. पाण्यात डुबकी मारतात. Kartik Purnima 2018: कार्तिक पौर्णिमा दिवशी गंगा स्नान करण्याचं महत्त्व काय? कशी कराल घरी पूजा ?


मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामध्येही (Mahalaxmi Mandir, Mumbai) कार्तिक पौर्णिमेनिमित्त अन्नकोट सोहळ्याचं आयोजन केलं जातं. यामध्ये महालक्ष्मीला 56 विविध गोड आणि अन्य पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो. तर रात्रीच्या वेळेस हाच प्रसाद सुमारे 500 भाविकांमध्ये वाटप करून अन्नकूट सोहळा साजरा केला जातो.
पुण्याच्या श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिरामध्ये तब्बल 221 प्रकारच्या मिष्टान्नांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण केला.

आज कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्येही (MahalaxmiMandir, Kolhapur) कार्तिक पौर्णिमेचा उत्साह आहे. देव दिवाळीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात खास रोषणाई करण्यात आली आहे. कार्तिक पौर्णिमेदिवशी शीख बांधवदेखील मोठ्या उत्साहात गुरुनानक जयंती साजरी (Gurunank Jayanti) करतात. महाराष्ट्रात नांदेड येथे गुरुद्वारामध्ये त्याचा खास उत्सव साजरा केला जात आहे.