
Jyeshtha Gauri Pujan 2020Marathi Wishes: महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पा पाठोपाठ गौराईचं (Gauri) देखील आगमन होतं. यंदा 25 ऑगस्ट दिवशी गौराई घरी आल्यानंतर 26 ऑगस्ट दिवशी ज्येष्ठा गौरी पुजनाचा सण आहे. पार्वती गौराई म्हणून घराघरात विराजमान होते आणि भक्तांना बाप्पाच्या सोबतीने आशिर्वाद देते. सवाष्णांसाठी गौरी पूजनाचा (Gauri Pujan) खास सोहळा असतो. मग यंदा या गौरी पुजनाच्या शुभेच्छा प्रियजनांना, नातेवाईकांना, मैत्रिणींना मराठमोळी शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), ग्रीटिंग्स (Greetings) सह HD Images, Wallpapers च्या माध्यमातून फेसबूक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारा देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करायला लेटेस्टली कडून बनवलेली शुभेच्छापत्र नक्की शेअर करू शकता. दरम्यान यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने गौरी-गणपतीचा आशिर्वाद यंदा अनेक जण ऑनलाईन माध्यमातूनच घेत आहेत. त्यामुळे तुमच्या शुभेच्छा देखील डिजिटल माध्यमाचा वापर करून WhatsApp, Instagram Reels, Facebook Messenger आणि Twitter द्वारा शेअर करून द्विगुणित करा.
गौरी आगमनाच्या दिवशी खड्याच्या, पिठाच्या किंवा तेरड्याच्या पानाच्या माध्यमातून प्रतिकात्मक स्वरूपात सूर्यास्तापूर्वी गौरी आणली जाते. त्यानंतर दुसर्या दिवशी त्याची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. Gauri Pujan 2020 Ukhane: गौरी पूजनाला हमखास होणारा नाव घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी महिलांसाठी खास उखाणे !
ज्येष्ठा गौरी पुजनाच्या शुभेच्छा


नक्की वाचा: Jyeshtha Gauri Pujan 2020: गौरी पूजनाला सौभाग्यवतींसाठी खास असणारं ओवसाचं सूप कसं तयार करतात? जाणून घ्या पुजाविधी.



गौराई म्हणजे भगवान शंकराची पत्नी आणि गणरायाची आई आहे. हिंदू पुराण कथांनुसार, गौरी बाल गणेशाला शोधत गौरी आगमनाच्या दिवशी पृथ्वीवर येते. 3 दिवसांच्या विसाव्यानंतर गणेशाला ती कैलास पर्वतात पुन्हा घेऊन जाण्यासाठी आलेली असते. त्यामुळे गणरायासोबत त्याच्या आईचं गौराईच्या रूपात पूजन करण्याची पद्धत आहे.
गौरी पूजनासोबत हा उत्सव महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो. महालक्ष्मीने कोलापूर राक्षसाला ठार करून लोकांना त्याच्या जाचातून मुक्त केले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे हा उत्सव महालक्ष्मी उत्सव म्हणून साजरा केला जातो. आता गौरी पूजन आणि महालक्ष्मी उत्सव बरोबरीने साजरा करण्याची पद्धत आहे.
गौरी पूजनाच्या दिवशी सकाळी गौराईला ओवसं भरून पूजा करून साजरा केला जातो. तर झिम्मा, फुगड्यांच्या पारंपारिक खेळ खेळून रात्र जागवली जाते. गणेशोत्सवाचे 6-7 दिवस उत्साहात, धूमधडाक्यामध्ये साजरा करून बाप्पाकडे सुख, समृद्धी मांगल्याची प्रार्थना केली जाते. तर शक्तीचं रूप म्हणून महिला गौराईकडे अखंड सौभाग्य मागितलं जातं. मग हा सण तुमच्या आयुष्यातही आनंद घेऊन येवो हीच प्रार्थना!