Shree Krishna Marathi Quotes: श्रावण वद्य अष्टमी ला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला. संपूर्ण भारतात श्रीकृष्णाच्या जन्म गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी म्हणून साजरी केली जाते. यंदा सोमवार, 30 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. श्रीकृष्णाला दशावतारांतील आठवा अवतार मानतात. मथुरेचा राजा कंस याला बळाचा गर्व झाल्याने तो प्रजेला फार त्रास देऊ लागला. त्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला. पुढे कृष्णाचे जीवनकार्य सर्व जनमाणसांसाठी आदर्श ठरले. कौरव-पांडवांचे युद्ध सुरु झाले तेव्हा अर्जुनाला गीतेच्या रुपाने उपदेश करुन त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली आणि भगवतगीता हिंदूंचा धर्मग्रंथ बनला. (Happy Krishna Janmashtami 2021 Messages: जन्माष्टमीदिवशी खास मराठी Wishes, Whatsapp Status, Greetings शेअर करून साजरा करा श्री कृष्ण जन्मदिवस)
या पवित्र ग्रंथांतील काही उपदेश आपण जन्माष्टमी निमित्त पाहणार आहोत. जीवनाचे सार सांगणारे हे उपदेश आपले दु:ख, त्रास, वेदना दूर करुन आपल्या आयुष्यात कर्तव्याच्या, आनंदाचा प्रकाश आणतील. पाहुया श्रीकृष्णाने भगवतगीतेत सांगितलेले काही खास उपदेश...
श्रीकृष्णाचे उपदेश:
1. प्रत्येकामध्ये आपली ताकद व आपली कमजोरी असते,
मासे कधी जंगलात पळू शकत नाहीत आणि
सिंह कधी पाण्यात राजा बनू शकत नाही,
त्यामुळे, प्रत्येकाला महत्व दिले पाहिजे.
2. कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका.
3. क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते,
आणि भ्रष्ट बुद्धीमुळे तो स्वतःचेच नुकसान करून बसतो.
4. जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला,
तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही.
5. अज्ञानी लोक स्वतःच्या लाभासाठी कार्य करत असतात,
पण बुद्धिमान लोक विश्व कल्याणासाठी कार्य करत असतात.
6. वाईट कर्म करायला लागत नाहीत, ते होऊन जातात,
आणि चांगले कर्म होत नाहीत, ते करायलाच लागतात.
7. माणूस चुकीचे कार्य करतेवेळी उजव्या-डाव्या, पुढे-पाठी
चारही बाजूला बघतो पण, वर बघायला मात्र विसरून जातो.
8. तुमच्या मनाला जर तुमच्या ताब्यात केलं नाही,
तर ते एखाद्या शत्रूप्रमाणे काम करायला लागेल.
9. कर्माचे फळ व्यक्तीला, अशा प्रकारे शोधून काढत,
जसं की वासरू कळपात असलेल्या, गायीमधून आपल्या आईला शोधते.
10. मनुष्य आपल्या विचाराने तयार झालेला असतो,
जसा तो विचार करतो, तसा तो बनतो.
गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा होतो. रस्तोरस्ती हंड्या सजवून टांगल्या जातात. मुलं उंचच उंच थर लावून हंड्या फोडतात. एकत्र येऊन नाचत गात हा कार्यक्रम साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने हा उत्सव रद्द करण्यात आला आहे.