
Krishna Janmashtami Messages in Marathi: संपूर्ण देशात भगवान श्री कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा दिवस ‘कृष्ण जन्माष्टमी’ (Krishna Janmashtami 2021) म्हणून उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या सणांपैकी असलेल्या जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास ठेवतात आणि कुटुंबाचे सुख आणि शांतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. हा उत्सव भगवान कृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यंदा सोमवारी 30 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
हा उत्सव मुख्यत्वे गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी खास पद्धतीने साजरा होतो. कंसाच्या दहशतीपासून पृथ्वीला मुक्त करण्यासाठी परमेश्वराने कृष्णाच्या रूपाने अवतार घेतला होता. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार समजले जातात. भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, लोक या दिवशी उपवास करतात आणि विधिवत पूजा-अर्चना करतात. तर या दिवशी आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक व प्रियजनांना खास मराठी Messages, Wishes, Whatsapp Status, HD Images च्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊ शकता.
जर तुम्ही धर्म कराल तर
देवाकडुन तुम्हांला मागावे लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावेच लागेल,
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

लोणी चोरून ज्याने खाल्ले
बासरी वाजून ज्याने नाचवले
आनंद साजरा करूया त्याच्या जन्मदिनी
ज्याने जगाला सत्य आणि प्रेम शिकवले
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा!

लगबग लगबग चाले अंगणी, लागू नये दुष्ट, तीट लावली कुणी
टकामका टकामका बाळलिला, दे गं सखी दे गं झोका पाळण्याला
ढगांच्या आडून चंद्र हासला, आकाशी ता-यांनी रास रचला
कृष्ण जन्मला गं बाई, कृष्ण जन्मला
गोकुळाष्टमीच्या मनापासून शुभेच्छा!

गोकुळमध्ये होता ज्याचा वास,
गोपिकांसोबत ज्याने रचला रास,
यशोदा, देवकी ज्याची मैय्या,
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्ण ज्याचे नाव, गोकुळ ज्याचे धाम,
अशा श्री भगवान कृष्णाला, आमचा शतश: प्रणाम
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास,
मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दरम्यान, जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या धूमधडाक्यात गोपाळकाला किंवा दहीहंडी (Dahi Handi) साजरी केली जाते. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून, त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. (हेही वाचा: Happy Janmasthami 2021: छप्पन भोग म्हणजे काय? गोकुळाष्टमी निमित्त कृष्णाला दाखवण्यात येणाऱ्या 56 पदार्थांबद्दल जाणून घ्या अधिक)
दुसरीकडे श्रीकृष्णाला दही, लोणी, दुध-तूप यांची आवड होती. लहानपणी यशोदा या गोष्टी त्याच्यापासून लपवून उंच शिंक्यावर ठेवत असे. मात्र आपल्या मित्रांच्या मदतीने बाळकृष्ण तिथपर्यंत पोहचून त्या गोष्टी फस्त करत असे. अशाप्रकारे या दोन्ही गोष्टींचे प्रतिक म्हणून गोकुळाष्टमी नंतर दहीहंडी हा सण साजरा केला जातो.