Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!
Effective Speech For Independence Day | (Photo Credits: File Photo)

15 August Independence Day Speech 2021: यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) आहे. दरवर्षी देशातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, झेंडावंदन झाल्यानंतर विविध कार्यक्रम, भाषण यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा रंगतो. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. स्वातंत्र्यदिन आणि देशभक्तीवर भाषण हा समीकरण ठरलेलं असतं. विद्यार्थी देखील विविध माध्यमातून माहिती गोळा करुन, मोठ्यांची मदत घेत भाषणाची तयारी करतात. मात्र भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे नक्कीच भाषण खास होईल. (Independence Day 2021 Fancy Dress Idea: स्वातंत्र्यदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी 'या' वेशभूषा साकारून आपल्या मुलांना करा तयार)

यंदा कोविड-19 संकटामुळे शाळा मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे अभ्यासबरोबरच इतर कार्यक्रम देखील व्हर्च्युअल माध्यमातून पार पडत आहेत. स्वातंत्र्यदिनही अशाच पद्धतीने साजरा होईल. पालकांच्या मदतीने मुलं देखील भाषणाची तयारी करतील. अशावेळी हे 5 मुद्दे ध्यानात ठेवा... (Independence Day 2021 Wishes in Marathi: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी Messages, Greetings शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव!)

शॉर्ट अँड स्वीट:

भाषण अधिक लांबवून रटाळ करु नका. मोठमोठी आणि शब्दबंबाळ वाक्य टाळा. थोडक्यात पण समजेल अशाप्रकारे वाक्यरचना करा. भाषणातील शब्द, वाक्य यामुळे ऐकणाऱ्यांना रस निर्माण व्हायला हवा. म्हणजेच भाषण शॉर्ट अँड स्वीट ठेवा.

स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व:

स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सर्वांना ठाऊक असले तरी ते तुमच्या भाषणात ते अधोरेखित होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे मांडून भाषण ओघवत ठेवा.

पोपटपंची टाळा:

भाषण दुसरे कोणीही लिहून दिले असले तरी त्यातील सर्व मुद्दे समजून घ्या. समजून उमजून केलेलं भाषण कायमच भिडतं. त्यामुळे पोपटपंची टाळा आणि मनं जिंका.

भाषणातील मुद्द्यांची तथ्य तपासणी:

भाषणातील मुद्द्यांची तथ्य तपासणी अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची आहे. त्यामुळे अधिकृत रिसोर्सच्या आधारे भाषणाची मांडणी करा. त्यामुळे तुमची फजिती होणार नाही आणि अचूक माहिती लोकांपर्यंत पोहचेल.

उच्चार आणि शब्दफेक:

भाषण तयार झाल्यानंतर ते सादर करताना तुमचे उच्चार आणि शब्दफेक महत्त्वाची असते. त्यावरुनच प्रेक्षकांना त्यात रस निर्माण होईल. स्पष्ट उच्चार आणि शब्दफेक (वाक्य उच्चारताना कोणत्या शब्दावर अधिक जोर द्यायचा, कोठे थांबावयचे) अचूक जमल्यास तुमचे भाषण प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. त्यामुळेच भाषणाचा सराव करताना तशाप्रकारेच करा.

भाषण तयार करताना या मुद्दयांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल, अशी आशा आहे. तुम्हाला सर्वांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!