Independence Day Marathi Wishes: इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यातून देशाची मुक्तता झाली तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासिय, क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीर, पुढारी यांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे, बलिदानाचे सार्थक झाले. भारताने मुक्त श्वास घेऊन आपला प्रवास सुरु केला आणि आज हा प्रवास स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करत आहे. या खास दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Quotes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. (Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!)
स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदानासोबतच अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सोसायट्या याठिकाणी स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. मात्र यंदाही कोविड-19 चे संकट कायम असल्याने व्हर्च्युअल पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. (Happy Independence Day 2021 Messages: खास Quotes, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून साजरा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन)
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक,
तरी सारे भारतीय एक
स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा,
त्यांच्या चरणी ठेऊया माथा
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अनेक वीरांबद्दल आपल्या मनांत कायम आदर असायला हवा. तसंच स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचे स्मरण करायला विसरु नका. त्यांचे बलिदान व्यर्थ जावू नये आणि भारत देश अधिकाधिक सामर्थ्यशाली, वैभवशाली करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करायला हवेत.