गेली 2 वर्षे कोरोना विषाणू महामारीमुळे राज्यात अनेक सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने होळी आणि धुळवडीची (Holi Dhulivandan 2022) लगबग सुरु झाली आहे. उद्या म्हणजे 17 मार्चला होळी आणि 18 मार्चला धुळवड आहे. परंतु त्याआधी राज्य सरकारने या उत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा विचार करत ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे.
राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून हे नियम पाळावेच लागणार आहेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
राज्य सरकारची होळी-धुळवडसाठी नवी नियमावली-
- रात्री दहाच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे.
- होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.
- राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जोरात लाऊड स्पीकर लावू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
- त्याचबरोबर होळी साजरी करताना मद्यपान आणि उद्धट वर्तन केल्यावर सुद्धा संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
- होळी खेळताना महिलांची खबरदारी घ्यावी. म्हणजेच होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढणार नाही, याबाबत संबंधित मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.
- कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
- धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.
- कुठेही आग लागेल असे कृत्य करू नये. (हेही वाचा: Holi 2022: 'या' सोप्या टिप्स फॉलो करून होळीमध्ये सुरक्षित ठेवा तुमचा स्मार्टफोन; वाचा सविस्तर)
दरम्यान, महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे. होळी नंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.