Holi 2022 HD Images: होळी सणानिमित्त खास Messages, Greetings, Wishes रंगांचा सण साजरा करा Facebook, Whatsapp Status च्या माध्यमांतून शुभेच्छा देऊन

होळी (Holi) हा संपूर्ण भारतात साजरा होणारा सण. प्रामुख्याने होळी (Holi 2022 HD Images and  Wishes) हा शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा होतो. भारत हा विविधतेने नटलेला देश असल्याने एकच सण विविध राज्य आणि प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. त्याता प्रदेशानुसार सणांची नावेही वेगवेगळी असतात. महाराष्ट्रात होळी सण मोठ्या पद्धतीने साजरा होतो. या सणाला महाराष्ट्रात 'शिमगा' म्हणूनही ओळखला जातो. होळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा (Happy Holi 2022) देण्याची पद्धत आहे. आपणही आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देऊ इच्छित असात तर त्यासाठी इथे  Facebook, Whatsapp Status च्या माध्यमांतून शुभेच्छा देण्यासाठी Messages, Greetings, Wishes आणि  HD Images देत आहोत. ज्या आपण मोफत डाऊनलोडही करु शकता.  होळीच्या दिवशी लाकडे, गोवऱ्या एकत्र करुन त्याची एक होळी तयार केली जाते. ही होळी पारंपरीक पद्धतीने मंत्रोच्चार करत पेटवली जाते. या वेळी पेटत्या होळीभोवती 'बो...बो...बो..' करत बोंब मारण्याची प्रथा आहे. होळी नंतर पाचच दिवसांनी रंगपंचमी साजरी होते.

होळी आणि धुलिवंदन या दोन सणांचा खूप जवळचा संबंध आहे. आदल्या दिवशी होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी पुरणपोलीचा नैव्यद्य केला जातो. घरात गोडधोडाचे जेवण केले जाते. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीच्या राखेमध्ये पाणी मिसळून त्याची राड बनवली जाते. ही राड एकमेकांच्या अंगावर टाकून धुलिवंदन साजरे केले जाते. त्याला धुळवड असेही म्हटले जाते. सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणूनही याकडे पाहिले जाते. (हेही वाचा, Holi 2022 Dhulivandan Wishes In Marathi: होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा Quotes, Messages द्वारा शेअर करत धुलिवंदन करा खास)

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाच्या शुभेच्छा!

होळी सणाला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी नावे आहेत. काही लोक याला 'होलिकादहन' किंवा 'होळी' म्हणतात. काही भागांमध्ये याच सणाला 'फाग', 'हुताशनी महोत्सव', 'दोलायात्रा',  'कामदहन' अशा विविध नावांनी ओळखले जाते. कोकणामध्ये होळीला 'शमगो' म्हटले जाते. मराठी महिन्यानुसार शेवटच्या म्हणजेच फाल्गुन महिन्यात हा सण साजरा होत असल्याने याला 'फाल्गुनोत्सव' असेही म्हटले जाते. काही लोक या सणास 'फाल्गुनोत्सव' असेही म्हणतात. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंत ऋतूचे आगमन होते त्यामुळे यास 'वसंतागमनोत्सव' असेही म्हटले जाते.