Holi 2022 Dates: यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी नेमकी कधी घ्या जाणून
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

होळी (Holi) सणाच्या निमित्ताने वसंत ऋतूची चाहूल लागते. हळूहळू वातावरणामध्ये बदल दिसायला लागतात. निसर्ग मुक्तपणे रंगांची उधळण करत असते त्याप्रमाणे होळी, धुलिवंदन (Dhulivandan) आणि रंगपंचमीच्या (Rangapanchami) सणाच्या निमित्ताने देखील रंगांची उधळण केली जाते. होलिका दहनाने (Holika Dahan) या सणाची सुरूवात होते तर रंगपंचमीला पर्यंत रंगांची उधळण केली जाते.

होळी सणाची सुरूवात हुताशनी पौर्णिमेला होलिका दहन करून केली जाते. त्यामुळे होलिका दहन 17 मार्च 2022 दिवशी होळी पेटवून केली जाणार आहे. होलिका दहनानंतर दुसरा दिवस धुलिवंदनाचा असतो. या दिवशी होळी खेळली जाते. 18 मार्च दिवशी रंगांची उधळण केली जाणार आहे तर रंगपंचमी हा दिवस देखील रंगांनी एकमेकांना भिजवण्याचा आहे. यंदा रंगपंचमी 22 मार्च दिवशी आहे.

हिंदू धर्मात दिवाळी नंतर होळी हा सण मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. त्यामुळे या निमित्त भारताच्या विविध प्रांतांमध्ये निरनिराळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. होळीच्या निमित्ताने पुरणपोळी, गुज्जिया, थंडाई बनवली जाते. नक्की वाचा: भारतात 'या' ठिकाणी लोक होळी खेळत नाहीत; त्यामागील रहस्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का.

होलिका दहन यंदा 17 मार्च दिवशी आहे. या दिवशी रात्री होळी 9 वाजून 6 मिनिटं ते 10 वाजून 16 मिनिटं या वेळेत पेटवली जाणार आहे. होळीच्या रूपात मनात वाईट अविचार सारे अनिष्ट जळून खाक व्हावे अशी कामना केली जाते. कोकणात होळीचा सण हा शिमगा म्हणून देखील ओळखला जातो.

उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाचा थाट मोठा असतो. आता भारतातील कोरोनाचा विळखा सैल होत असताना अनेक भागात कोविड निर्बंधांमधून मुक्तता मिळत आहे. त्यामुळे मागील 2 वर्ष होळीचा सण साधेपणाने साजरा झाला आहे तो आता यंदा मोठ्या उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे.