अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमी या मुहूर्तावर दसरा सण देशभर साजरा होतो. नवरात्रीच्या नऊ रात्रींनंतर हा दिवस येतो आणि या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी सीमोल्लंघन, शमी पूजन, शस्त्र पूजा तसेच अपराजिता देवीची पूजा अशा एकूण चार गोष्टी केल्या जातात. तसेच हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने कोणतंही शुभ कार्य दसऱ्याच्या मुहूर्तावर केलं जातं.
तर दिवाळी हा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुध्द द्वितेयेपर्यंत साजरा केला जातो. पाच दिवसांचा हा सण म्हणजे धनत्रयोदशी , नरक चतुर्थशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज.
पण दसरा आणि दिवाळी या दोन सणांमध्ये नेमका संबंध काय? दसऱ्याच्या बरोबर 21 दिवसांनंतर दिवाळी का येते या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
ऐतिहासिक जाणकारांनुसार प्रभू श्रीराम यांना लंकेतून अयोध्येत पायी चालत जायला तब्बल 21 दिवस लागले होते. त्याचा पुरावा देतो आजच्या काळातील हा Google Map.
दसऱ्याच्या मुहूर्तावर रामाने रावणाचे दहन केले आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रभू राम अयोध्येत पोहोचले होते.