Hariyali Teej (Photo Credits: File Image)

 Hariyali Teej 2020 Date & Significance: काल, 21 जुलै पासून महाराष्ट्रात श्रावण (Shravan 2020) महिन्याला सुरुवात झाली आहे, हिंदू धर्मीयांसाठी (Hindu) पवित्र मानला जाणारा हा महिना भगवान श्री शंकराचा (Lord Shankar) आवडता मास म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यामुळे श्री शंकराला प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात. यापैकीच एक म्हणजे हरियाली तीज (Hariyali Teej) . उत्तर प्रदेशातील भागात विवाहित महिला हे व्रत आवर्जून करतात. उद्या म्हणजेच 23 जुलै रोजी या व्रताची तिथी आहे. सौभाग्यचं रक्षण करण्यापासून ते कौटुंबिक सुखापर्यंत अनेक मागण्या देवापर्यंत पोहचवणे हे या व्रताचे उद्दिष्ट आहे. उत्तरेत जरी मुख्यत्वे साजरे केले जाणारे व्रत असले तरी या मागण्या सर्वत्र सारख्याच असतात त्यामुळे तुम्ही हे व्रत तुम्ही कुठूनही करू शकता. यासाठी यंदाची तिथी, या व्रताची पूजाविधी आणि खास नियम जाणून घेऊयात.

श्रावण महिन्यात शुक्ल पक्ष तृतीयेला हरियाली तीज साजरी केली जायते. यादिवशी शिव पार्वतीचे स्मरण करून पूजा केली जाते. हिंदू पौराणीक कथांनुसार पार्वतीनेही श्रावण महिन्यात उपवास करून शंकराला प्रसन्न केले आणि विवाह केला. त्यामुळे इच्छित वर प्राप्तीसाठी देखील कुमारिका श्रावणी सोमवारचे व्रत करतात.

हरियाली तीज पूजाविधी:

- या दिवशी सूर्योदयाच्या वेळी, शिव पिंड किंवा शंकराच्या प्रतिमेचे पूजन करावे.

-सूर्योदयाच्या नंतर पार्वतीच्या मूर्ती किंवा प्रतिमेला कुंकू, हिरवा चुडा असे सौभाग्य लेणे अर्पण करावे.

-शंकराला बेलपत्र, पांढरे शुभ्र वस्त्र आणि चंदन अर्पण करावे.

-शिव पार्वती सोबतच श्री गणेशाच्या मूर्तीचेही पूजन करण्याची पद्धत आहे.

-हरियाली तीज च्या व्रत कथेचे पठण करावे.

- शंकराची आरती म्हणावी.

हरियाली तीज व्रत नियम:

- हे सौभाग्य टिकवण्याचे व्रत आहे त्यामुळे या दिवशी सौंभाग्य लेणी आवर्जून धारण करा.

Hariyali Teej 2020 Latest Mehndi Designs: हरियाली तीज निमित्त 'या' लेटेस्ट मेहंदी डिझाइन्स कडून करा गौरी-शंकरची पूजा (See Images & Tutorial Videos)

-अपशब्द वापरणे टाळा.

- उपवास ठेवल्यास फलाहार करायला हरकत नाही.

- उपवास सोडते वेळी जेवणात लसूण, आलं, कांदा वापरणे टाळा.

- यादिवशी कोणालाही दुखावेल असे बोलणे, किंवा खोटे बोलणे टाळावे. यासाठीच अनेक जण या दिवशी मौन व्रत सुद्धा पाळतात.

दरवर्षी, हरियाली तीज निमित्त 48 तासाचे जागरण करायचे असते, यासाठी रात्री जागरणाचे खेळ खेळून, गाणी गाऊन महिलांसाठी सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर एकत्र येणे टाळा. याऐवजी घरातच व्रत साजरे करा.

(टीप- वरील लेख हा माहितीसाठी आहे. यामार्फत लेटेस्टली मराठी अंधश्रद्धा पसरवु इच्छित नाही.)