
दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन (Teacher's Day 2021) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिक्षक दिन भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. डॉ.सर्वपल्ली यांची देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर 1962 साली पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. या दिवशी आपण आपल्या आवडत्या शिक्षकांची आठवण काढून त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी व्यक्त करतो. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या दिवशी विशेष तयारी आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी सिनियर विद्यार्थी त्यांच्या ज्युनिअर्सना शिकवतात.
हा दिवस शिक्षकांसाठी खूप खास आहे. यानिमित्ताने देशभरात शिक्षकांच्या सन्मानार्थ अनेक लहान-मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि शिक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानही केला जातो. मुलांच्या जीवनात त्यांच्या शिक्षकांचे महत्त्वाचे स्थान आहे. केवळ शिक्षकच मुलांना उत्तम ज्ञान देतात, आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजवतात. एक विद्यार्थी चांगल्या शिक्षकाकडून शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यात उत्तम प्रगती करू शकतो. तर या शिक्षक दिनानिमित्त मराठी Quotes, Images, Whatsapp Status, Messages, Wishes शेअर करुन आपल्या शिक्षकांना खास शुभेच्छा नक्की द्या.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणाऱ्या प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन …
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

जो द्रव्य वाढवतो, तो काळजी वाढवतो,
परंतु जो विद्या वाढवितो, तो मान वाढवतो.
हे कार्य फक्त शिक्षकच करतो
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

दिले ज्ञानाचे आम्हाला भंडार
केले आम्हाला भविष्यासाठी तयार
आहोत आभारी त्या गुरूंचे
ज्यांनी केले आम्हाला जगासाठी तयार
राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया
शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

दरम्यान, डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हापासून त्यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा होत आहे. शिक्षक दिन जगातील 100 हून अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.