श्रावण महिना सुरु झाला की सणांची रेलचेल सुरु होते. श्रावणी सोमवार ते शनिवार पर्यंतची एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते. तर आज सर्वत्र रक्षाबंधनासह नारळी पौर्णिमेचा सण ही सर्वजण साजरा करताना दिसून येणार आहे. नारळी पौर्णिमा हा खासकरुन कोळी बांधवांसाठी खास आणि मानाचा सण मानला जातो. कारण या दिवशी कोळीबांधव समुद्राची पूजा करत त्याला सोन्याचा नारळ दिला जातो. तर वर्षभर होड्यांनी मासेमारीला जाताना वरुणदेव प्रसन्न असल्याने तो आपल्याला सहाय्य करतो अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेला होड्यांची सजावट केली जाते. तसेच कोळी बांधव नटूनथटून या दिवसाचा आनंद मोठ्या जल्लोषात साजरा करताना दिसून येतात. समुद्राला नारळ म्हणजेच श्रीफळ अर्पण करुन समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू थर्मात प्रथा आहे.(Narali Purnima 2020 Messages: नारळी पौर्णिमा निमित्त मराठमोळ्या Wishes, Images, WhatsApp Status शेअर करून कोळीबांधवाना द्या खास शुभेच्छा !)
नारळी पौर्णिनेमिनित्त घरात नैवेद्यासाठी गोडाचे पदार्थ बनवतात. या पदार्थांमध्ये खासकरुन ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनवले जातात. समुद्राची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे घालतात अशी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे.