Janmashtami 2020 Marathi Wishes: आज श्रीकृष्णाचा जन्मोत्सव सर्व भारतभर अगदी उत्साहात साजरा होईल. श्रीकृष्ण हा दशावतारातील आठवा अवतार आहे. मथुरेचा राजा कंस याला आपल्या बळाचा गर्व झाला आणि प्रजेला त्रास देऊ लागला. त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णू यांनी श्रीकृष्ण अवतारात पृथ्वीतलावर जन्म घेतला. तो दिवस म्हणजे श्रावण वद्य अष्टमी. म्हणजे गोकुळाअष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी. कृष्णाच्या बालक्रीडांनी गोकुळनगरीत आनंद पसरला आणि बाळकृष्णाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. आज मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदिरांमध्ये तसंच घरोघरी साजरा केला जाईल. त्यावेळी श्रीकृष्णाच्या पूजेसह पाळणा गायला जाईल. अनेक ठिकाणी भजन, प्रवजन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यंदा जन्माष्टमीवर कोरोना व्हायरसचे संकट आहे. त्यामुळे हा सण घरगुती स्वरुपात साजरा होईल.
जन्माष्टमी निमित्त एकत्र येऊन हा सण साजरा करता येणार नसला तरी आपले नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजन यांना डिजिटल माध्यमातून शुभेच्छा द्या. त्यासाठी शुभेच्छा संदेश, HD Images, Wishes, Greetings,SMS द्वारा फेसबूक आणि व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेजेसच्या द्वारा शेअर करून सेलिब्रेट करा यंदाचा जन्माष्टमीचा सण. (गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा विधी!)
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं
राम नारायणं जानकी वल्लभं
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
राधेची भक्ती, बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास
मिळून साजरा करू
श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आज खास
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
कृष्ण ज्याचंं नाव
गोकुळ ज्याचंं धाम
अशा श्री भगवान कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू आज गोकुळाष्टमीचा सण
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गोकुळमध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच सार्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपालकाला म्हणजेच दहीहंडी चा उत्सव साजरा होतो. श्रीकृष्णाच्या माखनचोरीची आठवण म्हणून दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. स्तोरस्ती उंचच उंच दहीहंड्या टांगलेल्या असतात. गोविंदा पथक या हंड्या फोडण्यासाठी मोठे थर लावतात. 'गोविंदा आला रे आला' असं म्हणत मुले घोळक्याने नाचताना पाहायला मिळतात. दहीहंडी फोडल्यानंतर फुटलेल्या हंड्यांचे तुकडे शुभ म्हणून घरी घेऊन जातात.