21 जून हा दिवस जागतिक योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा योग दिनाचं 9 वं वर्ष आहे. भारताच्या योगाभ्यासाचं मूळ असलं तरीही आज त्याचं लोण जगभर पसरलं आहे. देशा-परदेशात नागरिक मोठ्या उत्साहात 21 जून दिवशी हमखास योग दिन साजरा करतात. 2023 चा योग दिन 'वसुधैव कुटुम्बकम' या थीम वर साजरा केला जाणार आहे. योग हा निरोगी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. योग हा भारताच्या प्राचीन संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे आजच्या या दिवसाचं सेलिब्रेशन जगात सार्यांसोबत डिजिटल माध्यमातूनही करायचं असल्यास खास योग दिनाच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग़्स, WhatsApp Status, Messages, Wishes, Images शेअर करून योग प्रेमींसोबत हा दिवस थोडा खास बनवा.
भारताने मंजूर केलेल्या मसुद्याच्या ठरावाला १७७ देशांनी पाठिंबा दिला आणि २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाचा योग दिवस संयुक्त राष्ट्र सोबत साजरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वार्षिक कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडल्यानंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे याकडे ऐतिहासिक दिवस म्हणून पाहिले जात आहे. नक्की वाचा: International Yoga Day 2023: जागतिक योग दिवसाची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या .
योग दिनाच्या शुभेच्छा
निरोगी तन आणि शांत मनाची गुरूकिल्ली
म्हणजे योग!
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
कौटुंबिक स्वास्थ्यासाठी
शांततामय जीवनातून निरोगी आयुष्याकडे
जाण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे योगा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
योग आहे आरोग्यासाठी क्रांती
तुमच्या आयुष्यात आणेल सुख आणि शांती
योग दिनाच्या शुभेच्छा!
योग करेल रोज
त्यापासून दूर राहील रोग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
निर्धार नियमित योग करण्याचा
आजपासून जपा मंत्र निरोगी आरोग्याचा
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा!
नियमित योगाभ्यासामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात. शरीरासोबतच मन देखील शांत राहण्यास मदत होते. नियमित योगाभ्यासामुळे शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची शक्ती वाढते. श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. चंचलपणा नियंत्रित ठेवता येतो त्यामुळे अनेक मानसिक आजारांना निमित्त ठरणारी कारणं दूर ठेवण्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत होते.