Happy Ganesh Chaturthi 2024 Messages: भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीचे पृथ्वीवर आगमन होते. भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी बाप्पा 10 दिवस पृथ्वीवर राहतात. असे मानले जाते की गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) च्या दिवशी माता पार्वती आणि शंकर जी यांचे पुत्र गणेश जी यांचा जन्म झाला होता. या दिवशी घरात गणपती बसवल्याने वर्षभर सुख आणि आशीर्वाद मिळतात. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03.01 पासून सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 05.37 पर्यंत चालू राहील.
यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी शुभ मुहूर्तावर गणेशाची स्थापना करावी. या दिवशी गणेशभक्त एकमेकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतात. तुम्हीदेखील गणेश चतुर्थी व्हॉट्सॲप स्टेटस, गणेश चतुर्थी फेसबुक संदेश, गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा, गणपती बाप्पा स्वागत स्टेटस शेअर करून आपल्या मित्र-परिवारास खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.( हेही वाचा - Anant Ambani in Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal: अनंत अंबानी लालबागचा राजा मंडळाचे मानद सदस्य)
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा,
गणपती बाप्पा मोरया!!!
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या स्थापनेसाठी अडीच तासांचा शुभ मुहूर्त आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.10 ते दुपारी 1.39 या वेळेत बाप्पाची स्थापना करू शकता.