Basweshwar Jayanti 2021: बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Quotes द्वारा देत लिंगायत धर्मियांचा दिवस करा खास
बसवेश्वर जयंती । File Images

लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यंदा ही बसवेश्वर जयंती आज 14 मे दिवशी आहे. महात्मा बसवण्णांनी समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आज या बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून बसवण्णांच्या अनुयायींना बसवा जयंतीच्या शुभेच्छा देत आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला मदत करा. Akshaya Tritiya 2021 Messages In Marathi: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Wishes द्वारा शेअर करत आनंद द्विगुणित करा या मंगलमय दिवसाचा.

दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे. आजही त्यांचे अनुयायी याचे पालन करतात. बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या वचनांचा, कवणांचा समाजात प्रसार करण्यासाठी त्यांचेच हे काही विचार WhatsApp Status, Messages, HD Images च्या माध्यमातून शेअर करून हा दइवस साजरा करा.

बसवेश्वर जयंती शुभेच्छा

बसवेश्वर जयंती । File Images
बसवेश्वर जयंती । File Images
बसवेश्वर जयंती । File Images
बसवेश्वर जयंती । File Images
बसवेश्वर जयंती । File Images

यंदा भारतामध्ये कोरोनाचं संकट आहे त्यामुळे इतर धर्मियांच्या सणांप्रमाणेच देशात आज लिंगायत समाजाने देखील घरामध्येच राहून बसवेश्वर जयंती साजरी करावी असं आवाहन केले आहे. त्यामुळे आज घराघरात बसवण्णांच्या मूर्तीचं पूजन केले जाणार आहे.