Haldi Kunku Invitation in Marathi: मकर संक्रांतीनंतर (Makar Sankranti) रथसप्तमी (Rath Saptami) पर्यंत महाराष्ट्रामध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नववर्षातील या पहिल्या सणाच्या औचित्याने सार्या जणी एकत्र भेटतात. एकमेकींना तिळगूळासोबतच एखादं वाण म्हणजे भेटवस्तू देण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमाचे यंदा जर का तुम्हीही तुमच्या घरी आयोजन करणार असाल तर त्यासाठी तुमच्या मैत्रिणींना आमंत्रित करायला या खास आयडीयाज आम्ही घेऊन आलो आहोत. साधारणतः सगळं काही युनिक करू इच्छिणाऱ्या स्वभावाच्या तुम्ही असाल तर, नुसताच आमच्याकडे हळदी कुंकवाला या असा मॅसेज करून आमंत्रण करणं तुम्हाला आवडणार नाही, हो ना? पण मग असं काय करावं की ज्याने आमंत्रण तर दिले जाईलच पण तुमचं वेगळेपण देखील दिसून येईल, या काळजी वर उत्तर म्हणजे आमंत्रण करताना थोड्या कस्टमाईझ्ड पत्रिका पाठवून सर्वांना कार्यक्रमाला बोलवा. आजकालच्या डिजिटल जगात तर या पत्रिकांसाठी फार खर्चही येणार नाही. तुम्हाला हवं असल्यास प्रिंट लढून किंवा थेट WhatsApp Messages,Images च्या माध्यमातून देखील तुम्ही मैत्रिणी व नातेवाईकांना या पत्रिका पाठवू शकाल.
उदाहरण म्ह्णून हे काही नमुना आमंत्रण मजकूर आणि पत्रिका डिझाईन आम्ही शेअर करत आहोत यात तुमच्या मनानुसार बदल करून तुम्ही वापरू शकता. चला तर मग पाहुयात.. Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांत विशेष उखाण्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हमखास होणारा 'नाव घेण्याचा' अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खास उखाणे!
नमुना 1
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. .... रोजी साय॑काळी .. वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता:
नमुना 2
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
तारीख:
वेळ:
पत्ता:
नमुना 3
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा
दिनांक.. रोजी एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे. याकरिता आग्रहाचे आमंत्रण..
नमुना 4
लेडीज अँड लेडीज
एकदा किटी पार्टी पेक्षा
हळदी कुंकू समारंभात भेटू
कुठे?:
कधी?:
काय मग येताय ना?
नमुना 5
चला सयांनो संस्कृती जपू..
रथसप्तमीच्या मुहूर्तावर आयोजित
हळदी कुंकू कार्यक्रमासाठी
आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
तारीख:
वेळ:
पत्ता:
हळदी कुंकू हा समारंभ ही सध्याच्या काळात महिलांसाठी एक प्रथा नसून तो एक सोहळाच बनला आहे. आणि खरं पाहिलं तर त्यात काहीच हरकत नाहीये, आपल्याला जमेल, आवडेल, रुचेल, परवडेल अशा पद्धतीने आनंद साजरा करण्याचे हे माध्यम आहे, तुम्हीही या माध्यमातून अगदी मनमुराद आनंद साजरा करा.