Makar Sankranti Gift Ideas: हळदी कुंकू साठी वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी द्या घरगुती वापरातील 'या' महत्त्वाच्या वस्तू
Haldi Kunku Gift (Photo Credits: Instagram)

Best Makar Sankranti Gift Ideas: मकर संक्रांती म्हटलं की महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'हळदी कुंकू' (Haldi Kunku). हळदी कुंकू ही सध्याच्या काळात महिलांसाठी एक प्रथा नसून तो एक सोहळाच बनला आहे. या निमित्ताने आपल्या मैत्रिणी एकत्र येतात, विचारांची देवाण-घेवाण होते. तिळगूळ-लाडू दिले जातात. सगळं कसं अगदी साग्र संगीत होते. या हळदी-कुंकू मध्ये विवाहित महिलांना ओटीमध्ये देण्यात येणारे वाण हे फार महत्त्वाचे असते. अन्य भाषेत ही गिफ्ट असेल पण महाराष्ट्रामध्ये त्याला 'वाण' म्हणतात. नवविवाहित महिलांना पहिली पाच वर्षाचे वाण ठरलेले असतात. त्यात हळद-कुंकू, हिरव्या बांगड्या, फणी-आरसा, टिकल्या आणि नारळ असे हे पाच वर्षांचे वाण असतात. त्यानंतर मात्र महिलांना हळदी-कुंकू साठी काय वाण द्यावे हा मोठा प्रश्नच पडलेला असतो.

अमूक वस्तू घेतली तर ती एखाद्याकडे असेल तर तमूक गोष्ट घेतली तर त्याचा तिला काय उपयोग होईल असे प्रश्न वाण देणा-या महिलेला पडतात. अशा वेळी प्लास्टिकच्या वस्तूंना पसंती दर्शवितात. अशा महिलांना आम्ही प्लास्टिकच्या वस्तू घेऊ नका असे आवाहन करु व त्याजागी घरगुती वापराच्या उपयोगी वस्तू द्यावा असे सांगू.  Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांत विशेष उखाण्यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हमखास होणारा 'नाव घेण्याचा' अट्टाहास पूर्ण करण्यासाठी खास उखाणे!

पाहा कोणत्या आहेत या उपयोगी वस्तू:

1. साखर

2. साबण

3. भांड्याचे लिक्विड/साबण

4. मसाल्याचे पॅकेट्स

5. गरम मसाला

या वस्तू अशा आहेत की घरात त्या नेहमी वापरल्या जातातच. त्यामुळे तुम्ही दिलेले भेटवस्तू स्वरुप दिलेले वाण तुमच्या मैत्रिणींना नक्की आवडेल आणि त्यांनी ते वापरले याच्याहून वेगळा आनंद तुमच्यासाठी अजून काय असणार. नाही का?