Makar Sankranti 2020| Photo Credits: Twitter

Haldi Kumkum Marathi Ukhane : मकर संक्रांत हा नववर्षामधील पहिला सण असतो. पौष महिन्यातला थंडीचा गारवा सूर्याचे उत्तरायण सुरू झाले की हळूहळू कमी होण्यास सुरूवात होतो. महिला वर्गामध्ये मकर संक्रांतीच्या सणामध्ये विशेष आकर्षण ते म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे! या दिवसांमध्ये पिकं बहरलेली असतात. रब्बी हंगामातील पिक हातात आलेलं असतं. त्यामुळे साधारणपणे या दिवसात चैतन्याचं वातावरण असतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नवदांपत्यांसाठी मकर संक्रांतीचा सण हा फार महत्त्वाचा असतो. मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. या कार्यक्रमांमध्ये नाव घेण्याची एक अनोखी गंमत असते. 'नाव घेणं' म्हणजे काही विशिष्ट यमक पंक्तींमध्ये नवर्‍याचं नाव हुशारीने घेतलं जातं. जर नवं लग्न झालं असेल तर नाव घेण्यासाठी अधिक आग्रह होतो. मग यंदा आयत्या वेळेस संक्रांतीच्या सणाला नेमकं काय घ्यावं हा गोंधळ होऊ नये हे काही सोप्पे उखाणे नक्की लक्षात ठेवा. Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!

नव्या नवरीसाठी लग्नांच्या विधींपासून पुढील वर्ष विविध सण, पूजा समारंभात नावं घेण्याचा कायम आग्रह असतो. मुलींप्रमाणे मुलांसाठीदेखील नाव घेण्याचा आग्रह असतो. मग यंदा सुगड पूजन केल्यानंतर, संक्रातीला तीळगूळ वाटल्यानंतर तुमच्या नातेवाईकांनी, मित्र-मैत्रिणींनी नाव घेण्याचा आग्रह केला तर त्यांना हा गोड हट्ट या काही उखाण्यांचा माध्यमातून पूर्ण करून सार्‍यांची मनं जिंका. Haldi Kunku Special Ukhane: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हे मराठी उखाणे नक्की मदत करतील नाव घेण्याचा गोड हट्ट पूर्ण करायला!

मकर संक्रांतीचे उखाणे

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,

…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी

.. रावांचे नांव घेते, मकर संक्रांती च्या दिवशी

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,

… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.

… रावांचे नांव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी

नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,

..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा !

यंदा मकर संक्रांत 15 जानेवारी दिवशी आहे. महाराष्ट्रात या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजतात. घरामध्ये तीळगुळ, तेलपोळी, गूळपोळी असे गोडाचे पदार्थ बनवतात. एकमेकांना तीळगुळ देताना तिळगूळ घ्या गोड गोड बोला असा आग्रह केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत जुन्या कटू आठवणींना, राग, रुसवे फुगव्यांना तिलांजली देऊन नवी सुरूवात केली जाते.