Makar Sankranti Wishes | File Photo

Happy Makar Sankranti Marathi Messages:  जानेवारी महिन्यात हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे मकर संक्रांत (Makar Sankrant). भोगी, मकर संक्रांत आणि क्रिक्रांत असे तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यंदा 2020 हे ग्रेगेरियन कॅलेंडरचं वर्ष लीप इयर असल्याने मकरसंक्रांत 15 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे. नववर्षातला हा पहिला सण सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस द्वारा मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा, भोगीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images शेअर करतात. मग उत्तरायणाचा हा दिवस साजरा करताना भोगी (Bhogi) व मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा (Makar Sankranti Wishes) तुम्हांला मित्र परिवारासोबत, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा. Makar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सुघड पूजन कधी आणि कसं कराल?

मकर संक्रांत किंवा सूर्याच्या उत्तरायणाचा हा दिवस भारत देशामध्ये विविध प्रकारे सेलिब्रेट केला जातो. तमिळनाडूमध्ये 'पोंगल', उत्तर भारतामध्ये 'लोहरी' तर गुजरातमध्ये 'उत्तरायण' तर ईशान्य भारतामध्ये आसाम राज्यात 'बिहू' म्हणून हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात मकर संक्रांती दिवशी सुगड पूजन करून आणि तिळगूळाचे वाटप करून सण साजरा करण्याची पद्धत आहे. मग या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा डिजिटल युगात सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करताना व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम द्वारा शेअर करायला विसरू नका. अभिज्ञा भावे, सखी गोखले ते सुनील बर्वे सेलिब्रिटींच्या लूक मधून आयडियाज घेऊन यंदा मकर संक्रांती दिवशी 'ब्लॅक ड्रेस' मध्ये व्हा तयार!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स : 

स्पेशल करू मकर संक्रमण

करुन सार्‍या संकटांवर मात

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes | File Photo

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स :

नाते अपुले

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत

अधिकाधिक दॄढ करायचे…

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti Wishes | File Photo

हे देखील वाचा- Happy Makar Sankranti 2020 Wishes: मकर संक्रांती च्या शुभेच्छा मराठी Greetings, Messages, Images, Whatsapp Status, GIFs च्या माध्यमातून देऊन आनंदमयी वातावरणात साजरा केला नववर्षातील पहिला सण

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स :

गगनात उंच उडता पतंग

संथ हवेची त्याला साथ

मैत्रीचा हा नाजूक बंध

नाते अपुले राहो अखंड

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Makar Sankranti Wishes | File Photo

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स :

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची

कणभर तीळ, मनभर प्रेम

गुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवा

तिळगुळ घ्या गोडगोड बोला!  

Makar Sankranti Wishes | File Photo

व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स :

यंदा 15 जानेवारीचं मकर संक्रमण

तुम्हांला व तुमच्या परिवाराला

नवचैतन्य, सुख, शांती, प्रेम

घेऊन येवो हीच  आमची कामना

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes | File Photo

 मकर संक्रांत मेसेजेसचे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स कसे पाठवाल?

Android युजर्ससाठी गूगल प्ले स्टोअरवर मकर संक्रांत सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास स्टीकर्सचे पॅक उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी प्र्माणे तुम्ही मराठी भाषेमध्ये हे व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स डाऊनलोड करून शुभेच्छा पाठवू शकता. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्ससाठी इथे क्लिक करा.

मकर संक्रांतीच्या सणादिवशी तिळगूळ, तेलपोळी, गूळपोळी असे स्निग्धवर्धक पदार्थ बनवले जातात. मकर संक्रांती दिवशी एकमेकांमधील राग-रुसवे, कटूता विसरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदा तुम्ही देखील तुमच्या परिवारातील, प्रिय व्यक्तींमधील भांडणंं विसरून नव्याने तुमच्यामधील नातं फुलवा. 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' म्हणत आम्हीदेखील  तुम्हांला मकर संक्रांंतीच्या शुभेच्छा देत आहोत.