अभिज्ञा भावे, सखी गोखले ते सुनील बर्वे सेलिब्रिटींच्या लूक मधून आयडियाज घेऊन यंदा मकर संक्रांती दिवशी 'ब्लॅक ड्रेस' मध्ये व्हा तयार!
काळा हा रंग देखील पांढर्या रंगाप्रमाणेच एव्हरग्रीन आणि कायम स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यामुळे पैठणी साड्यांपासून अगदी इंडो फॅशनमधील कपड्यांमध्येही काळ्या रंगाचा वापर हमखास केला जातो.
Makar Sankranti 2020 Outfit Ideas: सामान्यपणे शुभ प्रसंगांमध्ये काळा रंग टाळला जातो पण मकर संक्रांत हा एक असा सण आहे ज्यामध्ये हमखास काळा रंग वापरला जातो. प्रामुख्याने नवदांम्पत्यांसाठी लग्नानंतर येणारा पहिला मकर संक्रांतीचा सण खास असतो. या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते. पुरूष आणि मुलं देखील मकर संक्रांतीचं औचित्य साधून काळ्या रंगाचे कपडे घालतात. जसा काळ बदलत आहे तसा फॅशन ट्रेंड देखील बदलत आहे. मग यंदा बदलत्या ट्रेंडनुसार मकर संक्रांतीसाठी तयार होताना पहा काही सेलिब्रिटी लूकमधून आयडियाज तुम्ही कशाप्रकारे तयार होऊ शकता. Makar Sankranti 2020: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्याचे काय आहे महत्त्व? असा करा यंदाचा लूक.
काळा हा रंग देखील पांढर्या रंगाप्रमाणेच एव्हरग्रीन आणि कायम स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यामुळे पैठणी साड्यांपासून अगदी इंडो फॅशनमधील कपड्यांमध्येही काळ्या रंगाचा वापर हमखास केला जातो. मग पहा अभिज्ञा भावे, सखी गोखले ते सुनील बर्वे यांच्या सारख्या सेलिब्रिटींचे खास काळया कपड्यांमधील लूक! Makar Sankranti 2020 Messages: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा उत्तरायणाचा सण!
इंडो वेस्टर्न लूक
इरकल साडी
वन पीस
सदरा कुर्ता
View this post on Instagram
ज्याला आला राग....त्याला नडला वाघ ! #waghchaswag #धुरळा 🔥🌪 📸 @sarrikaaaaaa
मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो त्यामुळे या दिवसामध्ये शरीरात उष्णता शोषून घेतली जावी म्हणून काळे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. काळा रंग सूर्य प्रकाश परावर्तित न करता शोषून घेतो त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे घालणं हितावह असतं.
(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2020 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

